पुणे -मुलाने मैत्रिणीवर एका महाविद्याल्याच्या कॅन्टीनमध्ये बळजबरीने शारीरिक संबध ठेवले. या घटनेचे चित्रीकरण दुसऱ्या मित्राकडून करुण घेतले. त्यानंतर तो व्हिडिओ इतर दोन मित्रांना पाठवले. त्या मित्रांनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मुलीकडे शरिरसुखाची मागणी केली. त्यानंतर पीडित मुलीने मुलाच्या आईकडे या संपूर्ण प्रकाराची तक्रार केली असता मुलाच्या आईने व बहिणीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडित मुलीला शिवागाळ देत मारहाण केली आहे.
कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये मुलीवर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत इतर मित्रांकडून शरीरसुखाची मागणी - शरीरसुखाची मागणी
मुलाने मैत्रिणीवर एका महाविद्याल्याच्या कॅन्टीनमध्ये बळजबरीने शारीरिक संबध ठेवले. या घटनेचे चित्रीकरण दुसऱ्या मित्राकडून करुण घेतले. त्यानंतर तो व्हिडिओ इतर दोन मित्रांना पाठवले. त्या मित्रांनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मुलीकडे शरिरसुखाची मागणी केली. त्यानंतर पीडित मुलीने मुलाच्या आईकडे या संपूर्ण प्रकाराची तक्रार केली असता मुलाच्या आईने व बहिणीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडित मुलीला शिवागाळ देत मारहाण केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पीडित तरुणी व आरोपी हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. त्याने तरुणीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अश्रफनगर येथील एका कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे एका दुसऱ्या मित्राच्यामार्फत चित्रीकरण केले. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरातील येथे हा प्रकार 2021 ते गुन्हा दाखल होईपर्यंत सुरुच होता. याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार मित्र त्याची आई व बहिण, इतर दोन मित्र, अशा पाच जणांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.