पुणे- बेकायदेशीरपणे टेलीफोन टॅपिंग केल्याप्रकरणी न्यायालयात वाद सुरू असतानाच पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला यांच्यावर हा गुन्हा दखल करण्यात आला ( Case Field Against IPS Rashmi Shukla ) आहे. सध्या त्या केंद्रीय प्रती नियुक्तीवर हैदराबाद येथे कर्यरत आहेत.
याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे ( IPS Sanjay Pandey ) यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाकून अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय सांगतो फोन टॅपिंगचा कायदा..? -इंडियन टेलिग्राफ कायदा १९८५ नुसार राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणणाऱ्या व्यक्तीचा, दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीचा, आंतरराष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या व्यक्तीचा, संवेदनशील कृती करणाऱ्या व्यक्तीचा, परदेशी मित्र राष्ट्रांच्या हिताला धोका पोहोचवणाऱ्या व्यक्तीचा फोन टॅप करण्याची अनुमती देण्यात येते. मात्र, यापैकी कोणतेही सबळ कारण नसताना राज्यातील राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले गेल्याची माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली.