पुणे- निगडी प्राधिकरण परिसरात 76 वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून चोरट्याने धमकी देत मारहाण करून 4 लाखांपेक्षा अधिक सोने, चांदीच्या ऐवज लंपास केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. या प्रकरणी निगडी पोलिसांनी केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या तरुणासह त्याच्या मित्राला अटक केली आहे. संबंधित चोरी त्यांनीच केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, इथून पुढे दरोडे आणि चोरी करण्याचे आरोपींनी ठरवले होते, त्यासाठी हत्यारे देखील विकत घेणार होते, अशी माहिती पोलीस तपासात मिळाली आहे. अस पोलिसांनी सांगितले आहे.
दीपक उर्फ दिप्या अंकुश सुगावे वय 20 रा. तळेगाव दाभाडे, मूळ नांदेड जिल्हा, संदीप उर्फ गुरू भगवान हांडे वय- 24 रा. चिंचवड मूळ- औरंगाबाद जिल्हा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना केअर टेकरचे काम देण्याच्या बहाण्याने बोलवून निगडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध 76 वर्षीय हेमलता पाटील या फ्लॅटमध्ये एकट्याच राहतात. जून महिन्यात त्यांच्या पतीचे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या पतीची देखभाल करण्यासाठी तेव्हा, केअर टेकर म्हणून तीन दिवसांसाठी यातील आरोपी दीपक हा आला होता. घरात दोघेच असल्याने घरातील प्रत्येक कानाकोपऱ्याची माहिती दीपक याने घेतली होती.
76 वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करुन लुटणारा निघाला 'केअरटेकर' - pune latest news
76 वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून चोरट्याने धमकी देत मारहाण करून 4 लाखांपेक्षा अधिक सोने, चांदीच्या ऐवज लंपास केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. निगडी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. यातील दीपक सुगावे हा तरुण महिलेच्या घरी केअरटेकर म्हणून काम करण्यासाठी गेला होता.
गेल्या आठवड्यात चाकूचा धाक दाखवून वृद्ध हेमलता यांना मारहाण करत घरातील 4 लाखांचा सोने चांदीचा ऐवज लंपास करण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस तपासात केअरटेकरच आरोपी असल्याची शक्यता लक्षात घेत मुख्य आरोपी दीपकला पोलिसांनी सापळा रचून केअरटेकरचे काम देण्याच्या बहाण्याने बोलवून ताब्यात घेतले. चोरीच्या प्रकरणात दीपकचा सहभाग असल्याबाबतची माहिती पोलीस कर्मचारी सतीश ढोले यांना मिळाली होती. पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 24 हजारांचा मुद्देमाल आणि दुचाकी हस्तगत केली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर काटे, पोलीस कर्मचारी सतीश ढोलेसह इतर कर्मचाऱ्यांनी केली आहे.