पुणे - जिल्ह्यातील कामशेत परिसरातून गांजा विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या घरातून 86 लाख रुपये किंमती चा 578 किलो गांजा कामशेत पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी एकाला कामशेत पोलिसांनी अटक केली असून दुसरा मुख्य आरोपी हा फरार झाला आहे. एनडीपीएस कायद्यांतर्गत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी धनाजी विठ्ठल जिटे याला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी संतोष रामचंद्र वाळुंज हा फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांजा विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या राहात असलेल्या घराच्या तळघरात 578 किलो गांजा कामशेत पोलिसांनी जप्त केला आहे. यावेळी श्वान पथकाची मदत घेण्यात आली होती.
लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कावंत... हेही वाचा -सावधान...! त्वचेतील 'हे' बदलही असू शकतात कोरोनाची लक्षणे
प्राप्त माहितीनुसार पुणे ग्रामीण पोलिसांचे सहाय्यक पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांना कामशेत येथील संतोष वाळुंज आणि धनाजी जिटे त्यांच्या घरात गांजा असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी नवनीत कावंत, कामशेत येथील पोलीस ठाण्यातील अधिकारी विठ्ठल बदडे, स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी पद्माकर घनवट, पृथ्वीराज ताटे, तसेच श्वान, पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला तेव्हा मुख्य आरोपीच्या घराच्या तळमजल्यात 578 किलो गांजा मिळाला असून त्याची किंमत 86 लाख 77 हजार 500 रुपये आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी संतोष हा फरार झाला असून दुसरा साथीदार धनाजी विठ्ठल जीटे याला कामशेत पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे जिल्ह्यातील कामशेतमध्ये लाखो रुपयांचा गांजा जप्त...