पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात अनेक कॅब चालकांची बिकट अवस्था झाली असून त्यांना आर्थिक चणचण भासत आहे. देशभरासह पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोलीस आहेत. अश्या परिस्थिती कॅब चालक अडचणीत आले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात कॅब चालकांची आर्थिक कोंडी; बँकांचे हप्तेही थकले
शहरातील यल्लेश शिवशरण हे कॅब चालक आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी मोटार घेतली. आता सर्व काही ठप्प असून आर्थिक मिळकत बंद झाली आहे. मोटारीचा थकलेला हप्ता भरायचा कसा असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.
शहरातील यल्लेश शिवशरण हे कॅब चालक आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी मोटार घेतली. आता सर्व काही ठप्प असून आर्थिक मिळकत बंद झाली आहे. मोटारीचा थकलेला हप्ता भरायचा कसा असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. यल्लेश शिवशरण हे चार ते पाच वर्षांपासून कॅब चालक आहेत. त्यांची मोटार ओला उबरला असते. त्यामुळे त्यांना वेळच्यावेळी पैसे मिळायचे. हप्ते देखील सुरळीत जात होते. परंतु, कोरोना विषाणूने थैमान घातले आणि होत्याच नव्हते झाले. जगभरात अनेकांचा यामुळे मृत्यू झाला.
केंद्र आणि राज्यशासन यांनी संचारबंदी आणि जमावबंदी लागू करत वाहनांना मज्जाव केला आहे. त्यानंतर तर २१ दिवसांचे लॉकडाऊन केल्याने याचा थेट परिणाम कॅब चालकांवर झाला. यल्लेश यांना दोन मुली असून घरात आई आणि पत्नी असते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कॅब बसून असल्याने संसाराचा गाडा चालवायचा कसा असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. वेळीच कोरोना च संकट दूर झाल नाही तर याचा मोठा फटका बसू शकतो अस ही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, कॅब चालकांप्रमाणे इतर व्यावसायिकांना देखील मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.