महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Cabdriver Knife Attack Pune: कॅबचालकाने जाण्यास नकार दिल्याने चालकावर हल्ला; पोलीस निरीक्षकांनाही मारहाण - Cab driver assaulted

कॅबचालकाने पुणे स्टेशन येथे जाण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यावर चाकूने वार (Knife attack on cab driver) करण्यात आला. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळावर गेलेल्या उपनिरीक्षकाला ढकलून सरकारी कामात अडथळा आणणार्‍या एकाला चतु:श्रुंगी पोलिसांनी (Chatu Shrungi police station) अटक केली. अभिनव शैलेंद्रकुमार सिंग (वय 27, रा. हिंजवडी )असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

कॅबचालकाने जाण्यास नकार दिल्याने चालकावर हल्ला
कॅबचालकाने जाण्यास नकार दिल्याने चालकावर हल्ला

By

Published : Sep 22, 2022, 3:09 PM IST

पुणे:कॅबचालकाने पुणे स्टेशन येथे जाण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यावर चाकूने वार (Knife attack on cab driver) करण्यात आला. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळावर गेलेल्या उपनिरीक्षकाला ढकलून सरकारी कामात अडथळा आणणार्‍या एकाला चतु:श्रुंगी पोलिसांनी (Chatu Shrungi police station) अटक केली. अभिनव शैलेंद्रकुमार सिंग (वय 27, रा. हिंजवडी )असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस अंमलदार संदीप शत्रुघ्न बर्गे यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 20 सप्टेंबरला दुपारी बाणेर रस्त्यावर डी मार्टच्या पार्किंगमध्ये घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस उपनिरीक्षकाली लाकडी दांड्याने मारहाण -त्यामुळे चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एन. गाडेकर घटनास्थळी गेले. त्यांनी आरोपीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीने त्यांच्या डोक्यातही लाकडी दांडके मारून त्यांना जखमी केले. पोलिस उपनिरीक्षक गाडेकर यांना ढकलून देऊन ते करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याबाबत चतु:श्रुंगी पोलीस पुढील तपास करत आहेत.

कॅबचालकाच्या पोटात चाकू खुपसला -कॅबचालक शिवराज जटाळे हे बाणेर परिसरात असताना, त्यास अभिनव सिंग याने पुणे स्टेशन येथे जाणे आहे असल्याचे सांगितले. परंतु, जटाळे यांना दुसरे काम असल्याने त्यांनी पुणे स्टेशनला जाण्यास नकार दिला. मात्र त्या रागातून आरोपीने त्याच्या जवळील चाकू काढून तो कॅबचालकाच्या पोटात खुपसून त्यांना जखमी केले. तसेच इतर लोकांनाही मारहाण करण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिस नियंत्रण कक्षास कळवली.

ABOUT THE AUTHOR

...view details