पुणे: पुणे -सातारा हायवेवर ( Pune - Satara Highway ) बस चालकाचा, हृदय विकाराचा तीव्र झटका ( Bus driver Dies Of Heart Attack ) आल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी चक्कर आल्याचे जाणवल्यानं बसचालकाने, प्रसंगावधान दाखवत बस वेळीच रस्त्याच्या बाजूला घेतल्यानं, 25 प्रवाशांचे प्राण वाचले.जालिंदर पवार ( Jalandar Pawar ) असं 45 वर्षीय मृत्यू झालेल्या बस चालकाचs नाव आहे. पुणे - सातारा महामार्गावरील नसरापूर गावाजळ ही घटना घडलीय. बस चालकाच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जातीय.
प्रवाशांचे प्राण वाचले -राज्य परिवहन महामंडळाची पालघर विभागाच्या वसई आगाराची एसटी बस, म्हसवडकडे प्रवाशांना घेऊन जातं होती. पुणे - सातारा महामार्गावरील वरवे, नसरापूर गावाच्या हद्दीत बस आल्यानंतर, मुळचे सातारा जिल्ह्यातील, खटाव तालुक्यातील पळशी गावच्या 45 वर्षाच्या जालिंदर रंगाराव पवार या बसचालकाला चक्कर येऊ लागली. वेळीच प्रसंगावधान दाखवून चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली. त्यामुळं बसमधील 25 प्रवाशांचे प्राण वाचलेत. याप्रकरणी बसचे वाहक संतोष गवळी यांनी नसरापूरच्या राजगड पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली.