पुणे - अंबिल ओढा लगत बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीच्या कामांमध्ये झालेल्या घोटाळ्याची ( Ambil Odha Protective Wall Scam ) चौकशी करावी. त्याचा अहवाल तयार करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला ( Bribery department ) पाठवावे, असे आदेशाचे पत्र लाचलुचपत विभागाने पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार ( Vikram Kumar, Commissioner, Pune Municipal Corporation ) यांना पाठवले आहे.
काय आहे प्रकरण -
अंबिल ओढा संरक्षण भिंत घोटाळ्या बाबत माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेंद्र दीक्षित ( Shailendra Dixit ) यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. आंबिल ओढ्याला २५ सप्टेंबर २०१९ रोजी आलेल्या महापुरानंतर सीमाभिंतीचा सुमारे ४०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. ओढ्यातील काही भागात भिंत बांधण्याचे कंत्राट सावी आणि टी अँड टी या कंत्राटदारांना संयुक्तपणे १५ कोटी १३ लाख रुपयांना बहाल करण्यात आले. मात्र त्यांनी ते न केल्याने तेच काम आता फेरनिविदेनंतर १८ कोटी ४९ लाख रुपयांमध्ये करण्यात येणार आहे. साडेतीन कोटींच्या या फटक्याशिवाय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणखी सव्वा कोटी रुपयांच्या फटक्यासह सुमारे ५ कोटींचा फटका महापालिकेला बसला. तांत्रिक पूर्ततेअभावी तो १० कोटीपर्यंत गेला. नेमक्या याच कार्यपध्दतीबाबत दीक्षित यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
महापालिकेचे तब्बल १० कोटी रुपयांचे नुकसान -