महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Ambil Odha : आंबील ओढा सरळीकरण थांबवा; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने आंबील ओढा ( Pune Ambil Odha Dispute ) सरळीकरण थांबवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पुणे पालिका प्रशासन आणि राज्य सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

आंबील ओढा सरळीकरण
Pune Ambil Odha

By

Published : Dec 25, 2021, 1:08 PM IST

पुणे -मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court on Pune Ambil Odha Dispute ) पुणे महानगरपालिकाच्या माध्यमातून चाललेल्या फायनल प्लॉट 28 वरील आंबीलओढा ( Pune Ambil Odha Dispute ) सरळीकरण करण्याच्या कामास अखेर स्थगिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आंबील ओढ्याचा हा मुद्दा जोरदार चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. 5 महिन्यांपूर्वी आंबील ओढा सरळीकरण करण्याचा घाट घालत पुणे महानरपालिका या जमिनी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत होता.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावर याचिकाकर्ते किशोर कांबळे यांची प्रतिक्रिया
या प्रकरणात पुणे पालिका प्रशासन आणि राज्य सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले होते. पुणे महागरपलिकेने ( Pune Municipal Corporation ) प्रचंड पोलीस बंदोबस्तात या झोपड्या पडण्यास सुरूवात केली होती आणि याच कारवाईच्या विरोधात अॅड विवेक चव्हाण व अॅड किरण कदम यांनी या झोपड्या पाडण्यासाठी न्यायालयातून स्थगिती आणली होती.या स्थगितीनंतर स्थानिकांनी उच्च न्यायालयात ओढा सरळीकरणाला विरोध करणारी याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने याला स्थगिती दिली आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर याचिकाकर्ते किशोर कांबळे यांनी न्यायालयाचे आभार मानले. पुणे महानरपालिकेने सगळे नियम पायदळी तुडवत हा निर्णय घेतला होता. पण महापालिकेला आता चपराक बसली आहे, अशी भावना व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details