पुणे - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एक आगळा वेगळा उपक्रम पाहायला मिळाला आहे. चक्क एक दिवसासाठी पोलीस आयुक्तालयाचा कारभार एका दृष्टीहीन महिलेकडे देण्यात आला होता. तर, अप्पर पोलीस आयुक्तांचा खुर्चीवर पतीच्या निधनानंतर संघर्ष कराव्या लागणाऱ्या महिला विराजमान झाल्या होत्या. रीना पाटील असे या दृष्टीहीन महिलेचे नाव असून ज्योती माने या अप्पर पोलिसांच्या खुर्चीवर बसल्या होत्या. त्या दोघींना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी कडक सॅल्युट केला.
एका दिवसासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदाची सूत्रे दृष्टीहीन महिलेच्या हाती! - दृष्टिहीन महिला पोलीस आयुक्त
एका दिवसासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदाची सूत्रे दृष्टीहीन महिलेच्या हाती देण्यात आली होती. सर्व सामान्य नागरिकांना आमचे काम समजले पाहिजे. आमच्या प्रति संवेदनशीलता दाखविली पाहिजे. या हेतूने ही नवीन संकल्पना राबविण्यात आली. त्याच बरोबर सर्व घटकांबरोबर आम्ही आहोत हे दाखविण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.
दरम्यान, पोलीस उपायुक्त पदाची एका दिवसाची जबाबदारी सुशिक्षित दिव्यांश तामचीकर याच्यावर सोपविण्यात आली होती. हा सर्व प्रकार तिघांनाही भाराहून टाकणारा होता.
सर्वसामान्यांना काम समजावे म्हणून हा उपक्रम राबविला-
पोलीस आयुक्त म्हणाले की, सर्व सामान्य नागरिकांना आमचे काम समजले पाहिजे. आमच्या प्रति संवेदनशीलता दाखविली पाहिजे. या हेतूने ही नवीन संकल्पना राबविण्यात आली. त्याच बरोबर सर्व घटकांबरोबर आम्ही आहोत हे दाखविण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच महिलांनी त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल शांत न राहता त्याच्या विरोधात आवाज उठवायला हवा, आम्ही त्यांच्यासोबत आहोतच, असा विश्वास अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी महिलांना दिला.