महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Girl Kidnapped : पुण्यात अंध दाम्पत्याच्या मुलीचं अपहरण.. १३ दिवसांपासून मुलगी सापडेना, पालक चिंतेत - पुणे पोलिसांत गुन्हा दाखल

पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे कसे बारा वाजले आहेत याच उदाहरण समोर आलं आहे. एका अंध दाम्पत्याच्या १२ वर्षांच्या मुलीचं अपहरण झालं ( Blind Couples Daughter Kidnapped In Pune ) असून, १३ दिवसांपासून ही मुलगी गायब आहे. त्यामुळे पोलीस ( Pune Police ) नेमकं करताहेत काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

पोलीस
पोलीस

By

Published : Jan 12, 2022, 3:27 AM IST

पुणे - पुण्यातील लोहगाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी १२ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण झालं आहे. पुण्यातील लोहगाव परिसरात राहणारे एक अंध दाम्पत्य धानोरी परिसरात एक स्टॉल चालवून आपला उदरनिर्वाह करते. याच दाम्पत्याची सई नावाची १२ वर्षाची मुलगी २७ डिसेंबरपासून गायब आहे. तशी तक्रार देखील या अंध दांपत्याने पोलीस स्टेशनमध्ये ( Pune Police ) दाखल केली ( Blind Couples Daughter Kidnapped In Pune ) आहे. मात्र, गेल्या १३ दिवसांपासून सई गायबच ( Pune Girl Kidnapped ) आहे.

पुण्यात अंध दाम्पत्याच्या मुलीचं अपहरण.. १३ दिवसांपासून मुलगी सापडेना, पालक चिंतेत

काय आहे प्रकरण

अनीता नाडकर्णी ( नाव बदललेले ) आणि त्यांचे पती हे अंध आहेत. सई ( नाव बदललेले ) ही त्यांची १२ वर्षाची मुलगी आपली शाळा आणि अभ्यास सांभाळून तिच्या आई- वडिलांना त्यांच्या स्टॉलवर कामात मदत करायची. २७ डिसेंबरला देखील ती तीच्या पालकांसोबत दुकानात आली. मात्र, दुपारी ती गायब झाली. हे कळताच नाडकर्णी दाम्पत्याने सईची शोधाशोध सुरू केली. पण सई कुठच सापडली नाही. हे लक्षात आल्यानंतर तिच्या आई- वडीलांनी जवळचे पोलीस स्टेशन गाठले. पण, हद्दीचे कारण देत जुईच्या आई- वडीलांना अनेक पोलीस स्टेशन फिरावे लागले. पण शेवटी विमाननगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला.

१३ दिवस झाले सई बेप्पताच

आज १३ दिवस उलटून गेल्यावरही सई सापडत नाही, हे पाहून तिच्या आई वडिलांनी थेट पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि समाजकल्याण आयुक्तांची भेट घेतली आहे. आयुक्तांनी सईला लवकरात लवकर शोधू असं आश्वासन दिलं असल्याचं सईच्या आईने सांगितलं. दरम्यान, विमानतळ पोलीसांनी २८ डिसेंबरला कलम ३६३ अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेतला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निगुडगे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details