महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mango Masti competition Pune : स्पर्धेच्या माध्यमातून दृष्टिहीन मुलांनी घेतला आंब्यांचा आस्वाद; जिंकले आकर्षक बक्षिसे - अंध अनाथ मुलांनी घेतला आंब्याचा आस्वाद

निरंजन सेवाभावी संस्थेच्या ( Niranjan Sevabhavi Organization ) वतीने राजाराम पूलाजवळील राजेंद्रवन लॉन्स येथे दृष्टीहिन ( Competition for blind children to eat mangoes ) आणि वंचित विशेष मुलांसाठी निरंजन मँगो मस्ती ( Mango Masti competition Pune ) या आंबे खाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिमुकल्यांना विविध भेटवस्तू आणि आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यंदा स्पर्धेचे १० वे वर्ष होते.

s
s

By

Published : May 13, 2022, 9:00 PM IST

Updated : May 13, 2022, 9:19 PM IST

पुणे -फळांचा राजा असलेल्या आंब्यांचा स्पर्श आणि चवीने गोडवा चाखत दृष्टीहिन मुलांनी देखील आंब्यांवर ताव मारला. पिवळ्याधम्मक हापूस आंब्यांची मेजवानी आणि डिजेच्या तालावर थिरकण्याची संधी मिळाल्याने दृष्टीहिन ( Competition for blind children to eat mangoes ) आणि वंचित-विशेष अशा 200 हून अधिक मुला-मुलींच्या चेह-यावर हसू उमलले. निरंजन सेवाभावी संस्थेच्या ( Niranjan Sevabhavi Organization ) वतीने राजाराम पूलाजवळील राजेंद्रवन लॉन्स येथे दृष्टीहिन आणि वंचित विशेष मुलांसाठी निरंजन मँगो मस्ती ( Mango Mastti competition Pune ) या आंबे खाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चिमुकल्यांना विविध भेटवस्तू आणि आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यंदा स्पर्धेचे १० वे वर्ष होते.

आढावा घेताना प्रतिनिधी



सामान्य कुटुंबातील मुलांना हे फळ चाखण्याची संधी नेहमी मिळते. परंतु दृष्टीहिन, अनाथ, उपेक्षित मुलांना देखील आंबे खाण्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित आंबे खाण्याची स्पर्धा ही गेल्या 10 वर्षांहून अधिक काळापासून घेण्यात येत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा घेण्यात आली नाही. यंदाच्या या स्पर्धेत 1000 हुन देवगडचे हापूस आणण्यात आले होते. हापूसचा या मुलांनी मनसोक्त आनंद लुटला.



आंबे खाणे स्पर्धेतील आंब्याच्या कोयी संस्थेचे कार्यकर्ते विविध गड-किल्ल्यांच्या परिसरात पेरणार असून वृक्षसंवर्धनाच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था, धर्मवीर संभाजीराजे अनाथ आश्रम, घरटे प्रकल्प, माहेश फाऊंडेशन, दिव्यांग प्रतिष्ठान, प्रेमभाव प्रज्ञा शाळा आदी संस्थांतील 200 पेक्षा अधिक विशेष मुलांनी मँगो मस्तीमध्ये सहभाग घेतला होता. 5 वर्षांपासून पुढे मुले या आंबे खाण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले होते, अशी माहिती यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नवनीत मानधनी यांनी दिली.

हेही वाचा -Budhbhushanam Granth Amravati : अमरावतीत साकारला 24 किलो वजनाचा 4089 पेनांनी लिहिलेला छत्रपती संभाजी महाराजांचा 'बुधभूषणम् ग्रंथ'

Last Updated : May 13, 2022, 9:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details