महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे हेमंत रासने यांची तिसऱ्यांदा निवड - पुणे स्थायी समिती अध्यक्ष भाजपचे हेमंत रासने

पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे हेमंत रासने यांची तिसऱ्यांदा निवड झाली आहे. तर, शिक्षण समितीच्या अध्यक्षपदीही भाजपाच्या उमेदवार मंजुश्री खर्डेकर यांचा विजय झाला आहे.

bjps-hemant-rasane-elected-as-standing-committee-chairman-for-the-third-time-of-pune
हेमंत रासने

By

Published : Mar 5, 2021, 7:43 PM IST

पुणे- महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांची तिसऱ्यांदा निवड झाली आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार बंडू गायकवाड यांना पराभव पत्करावा लागला आहे. भाजपचे हेमंत रासने यांना 10 तर महाविकास आघाडीचे उमेदवार बंडू गायकवाड यांना 6 मते मिळाली आहे. तसेच शिक्षण समितीच्या अध्यक्षपदीही भाजपाच्या उमेदवार मंजुश्री खर्डेकर यांचा विजय झाला आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे हेमंत रासने यांची तिसऱ्यांदा निवड..
भाजपाकडून व्हीप जारी -सांगली महापालिकेत पराभव झाल्यानंतर धसका घेतलेल्या भाजपाने पुणे महापालिकेच्या स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या निवडणुकीसाठी नगरसेवकांना व्हीप जारी केला होता. भाजपाचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याच्या चर्चावरून भाजपने स्थायी आणि शिक्षण समितीच्या निवडणुकीपूर्वी सावध पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले.येणाऱ्या वर्षात अर्थसंकल्प पूर्ण करणार -भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिली. तसेच पक्षाने दिलेली जबाबदारी येत्या काळात पूर्ण करणार आहे,असे हेमंत रासने म्हणाले. तसेच यंदाचा अर्थसंकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न येणाऱ्या वर्षभरात करेल, असा विश्वास स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी व्यक्त केला.

विरोधकांनी पुण्याच्या विकासासाठी मदत करावी -
विरोधकांनी विरोधाची पारंपरिक भूमिका सोडून द्यावी आणि पुणे शहराच्या विकासात आम्हला मदत करावी. जगाच्या नकाशावर जी सर्वोत्कृष्ठ शहरे आहेत, त्या शहरांच्या पंक्तीत जायची क्षमता या पूणे शहराची आहे. महापालिकेने पूर्ण क्षमतेने याचा वापर केला तर आपण जगातील सर्वोत्कृष्ट दहा शहरांमध्ये जाऊ शकतो, असेही यावेळी हेमंत रासने म्हणाले.

हेही वाचा -अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामीला दिलासा

ABOUT THE AUTHOR

...view details