महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात भाजपची बॅनरबाजी; पंढरपूरच्या पूजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींना येऊ दे, विठ्ठलाकडे साकडे - BJP banner waving

पुण्यात सध्या बॅनरबाजीला सूरवात झाली असून यंदाच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना येऊ दे, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे.

BJP's banner waving
BJP's banner waving

By

Published : Jun 22, 2022, 4:45 PM IST

पुणे: राज्यात सध्या राजकीय वातावरण हे चांगलच तापलेलं आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे संकेत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिलेत. “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने,” असं राऊतांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे. यानंतर पुण्यात सध्या बॅनरबाजीला ( BJP banner hoisting in Pune ) सुरुवात झाली असून, यंदाच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना येऊ दे, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे.

पुण्यात भाजपची बॅनरबाजी; पंढरपूरच्या पूजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींना येऊ दे, विठ्ठलाकडे साकडे
जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला सुरवात झाली असून आज पालखीचे आगमन हे पुणे शहरात ( Palkhi arrives in Pune city today ) होणार आहे. या निमित्ताने पुण्यातील शिवाजीनगर येथील भाजपचे नेते प्रकाश सोलंकी यांनी बॅनरबाजी करत विठ्ठलाकडे साकडे घातले आहे. ज्यामध्ये म्हणले आहे की, हे माऊली तुझा कृपा आशीर्वाद सदैव राहू दे. तुझ्या पंढरपूरच्या पूजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी यांना येऊ दे. अशा आशयाचे बॅनर लावण्यात आल आहेत. यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details