पुणे -आज दुसऱ्यांदा होत असलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा एकदा गोंधळ पाहायला मिळाला आहे. पुण्यात 123 केंद्रावर होत असलेल्या परीक्षेत 13 ते 14 केंद्रावर अधिकारी वर्गच पोहचले नसल्याने 10 वाजता सुरू होणारी परीक्षा साडेअकरा वाजता देखील सुरू झाली नव्हती. पुण्यातील आबेदा इनामदार कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला. आरोग्य विभागाच्या या गोंधळाविरोधात भाजपच्यावतीने परीक्षा केंद्राबाहेर आंदोलन करण्यात आले. आरोग्य मंत्र्यांनी आरोग्य विभागातही एखाद्या सचिन वाझेला वसुलीसाठी ठेवलं कि काय, असा सवाल भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे.
एमपीएससीच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात यावी -
राज्यातील विविध जिल्ह्यातून विद्यार्थ्या या परीक्षेला आले आहेत. 10 वाजता परीक्षा सुरू होईल या आशेने रात्री बे रात्री आलेले विद्यार्थ्यांना मोठ्या गोंधळाला सामोरे जावं लागलं आहे. एकतर ही परीक्षा एमपीएससीच्या माध्यमातून घेण्यात यावी आणि ज्या जिल्ह्यातून विद्यार्थी हे आलेले आहे त्याच जिल्ह्यात ही परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे.
आरोग्य विभागाच्या परीक्षा केंद्राबाहेर भाजपचे आंदोलन.. येथेही सचिन वाझे आहे का ?, भाजपची टीका - आरोग्यविभागाच्या परीक्षेत गोंधळ
आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा एकदा गोंधळ पाहायला मिळाला आहे. आरोग्य विभागाच्या या गोंधळाविरोधात भाजपच्यावतीने परीक्षा केंद्राबाहेर आंदोलन करण्यात आले. आरोग्य मंत्र्यांनी आरोग्य विभागातही एखाद्या सचिन वाझेला वसुलीसाठी ठेवलं कि काय, असा सवाल भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे.
health department's examination
ज्या न्यास कम्युनिकेशनला या परीक्षेचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. ती कंपनी उत्तर प्रदेशात ब्लॅक लिस्टमध्ये आहे, अशी माहिती मिळत आहे. असं असताना देखील या कंपनीला ठेका देण्यात आला आहे. राज्य सरकार या विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळत आहे, अशी टीका देखील यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.
Last Updated : Oct 24, 2021, 3:25 PM IST