पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर असताना फिरोजपूरमध्ये आंदोलकांनी नाकेबंदी केल्यामुळे (PM Security Breach) उड्डाणपूलावर अडकून पडले होते. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचा पंजाब दौरा रद्द करण्यात आला. सदर घटनेमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या जीवाला धोका पोहोचण्याची शक्यता वर्तवली गेली होती. पुणे शहर भाजपच्या वतीनेमहात्मा गांधी पुतळा, पुणे स्टेशन येथे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह आंदोलन करण्यात ( BJP's Agitation in Pune ) आले होते. यावेळी खासदार प्रकाश जावडेकर (Prakash Jawdekar Present on Protest) उपस्थित होते.
काय प्रकरण ?
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर होते. यावेळी भारतीय किसान युनियनने केलेल्या निदर्शनांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा फिरोजपुर येथील उड्डाणपुलावर 20 मिनिटे अडकून पडला होता. त्यानंतर मोदींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले. पंजाब सरकारने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करून या प्रकरणाचा अहवाल तीन दिवसात देण्याचे आदेश दिले आहेत.