पुणे -बिहार विधानसभेच्या निकालांवरून काही गोष्टी या स्पष्ट होत असल्याचे सांगत या निवडणुकीमध्ये जो सत्तासंघर्ष झाला त्यात जे नवीन मुद्दे आले होते. त्यामध्ये बाहेरून आलेले लोक तरुणांचा रोजगार तसेच स्थलांतरितांचे मुद्दे या विषयांचा प्रभाव हा निकालावर पडलेला नाही, असे आतापर्यंतच्या निकालावरून समोर येत असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांनी व्यक्त केले आहे.
प्रचारादरम्यान आलेले स्थलांतर, रोजगार हे नवे मुद्दे प्रभावी ठरले नाहीत - पवार हेही वाचा -अंबाबाई मंदिर किरणोत्सव सोहळा; पहिल्या दिवशी सूर्यकिरणे देवीच्या गुडघ्यापर्यंत
प्रचारादरम्यान आलेले स्थलांतर, रोजगार हे नवे मुद्दे प्रभावी ठरले नाहीत, असे पवार यांनी म्हटले आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून हिंदी भाषिक राज्यांमध्ये सर्वात शेवटी बिहार राज्यात भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून बाजी मारता आली आहे. तसेच, भाजपची जी रणनीती होती, त्यानुसार नितीश कुमार यांच्या जागा मर्यादित राखण्यातही भाजपला देखील यश आले असल्याचे मत प्रकाश पवार यांनी व्यक्त केले आहे.
एकंदरीतच या निवडणुकीमध्ये सध्या भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येतोय. दुसरीकडे आरजेडी आणि काँग्रेस यांनीही चांगली कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी आरजेडी आणि काँग्रेसची जी परिस्थिती होती त्यापेक्षा खूप चांगली परिस्थिती आताच्या विधानसभा निवडणुकीत दिसून येत असल्याचे प्रकाश पवार यांना म्हटले आहे. एकंदरीतच या निवडणुकीच्या कलानुसार भाजपची रणनीती ही बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे दिसून येत असल्याचे मत प्रकाश पवार यांनी व्यक्त केले
हेही वाचा -दुसरी लाट आलीच तर.. आम्ही सज्ज; अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणींची माहिती