महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BJP On Loadshedding Issue : लोडशेडिंग विरोधात भाजपाचे शनिवारपासून राज्यभर आंदोलन; आशिष शेलारांची माहिती - आशिष शेलारांचे महाविकास आघाडीवर आरोप

देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीज निर्मिती केंद्र बंद ( Power plant closed ) करण्यात आली असून वीज नाही, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. वीज पुरवठा ( Power supply ) करणाऱ्या तिन्ही कंपनीचे काम बेशिस्त करण्याचे काम हे या सरकारने केले आहे. जाणून बुजून सरकारकडून भारनियन निर्माण केले जात आहे. याच विरोधात भाजपा ( BJP agitation on power issues ) उद्यापासून (शनिवारी) राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपा नेते आशिष शेलार ( BJP leader Ashish Shelar ) यांनी दिला आहे.

आशिष शेलार
आशिष शेलार

By

Published : Apr 22, 2022, 5:43 PM IST

पुणे -कालपर्यंत राज्यात विजेची अघोषित आणीबाणी होती. मात्र काल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत कबुली दिली आहे. सरकार या सगळ्या गोष्टी जाणूनबुजून करत असून आधी विजेची टंचाई निर्माण करायची आणि चढ्या दराने वीज घेत कंपनीकडून टक्केवारी घ्यायची, असा प्रकार सरकारकडून सुरू असल्याची टीका भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीज निर्मिती केंद्र बंद ( Power plant closed ) करण्यात आली असून वीज नाही, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. वीज पुरवठा ( Power supply ) करणाऱ्या तिन्ही कंपनीचे काम बेशिस्त करण्याचे काम हे या सरकारने केले आहे. जाणून बुजून सरकारकडून भारनियन निर्माण केले जात आहे. याच विरोधात भाजपा ( BJP agitation on power issues ) उद्यापासून (शनिवारी) राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपा नेते आशिष शेलार ( BJP leader Ashish Shelar ) यांनी दिला आहे.




'अनधिकृत भोंग्यावर कारवाई ही झालीच पाहिजे' :सगळे पक्ष भोंग्यावरून राजकारण करत आहेत. मात्र भाजपा भारनियमनावर लक्ष ठेवून आहे, असे सांगत अजान, भोंगे, हनुमान चालीसा या सगळ्यांना वीज ही लागणारच असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितलं आहे. मात्र अनधिकृत भोंग्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. जर सरकारने अनधिकृत भोंग्याना अधिकृत करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जशास तशे उत्तर देऊ, असा इशारा देखील भाजपाने सरकारला दिला आहे. त्याचबरोबर जर हनुमान चालीसा कार्यक्रम झाले तर त्याचे स्वागतच करू, असे स्पष्ट मत आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे.


'राणा दाम्पत्य हे काही अतिरेकी नाही' :खासदार नवनीत राणा आणि रवी राणा हे मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्यामुळे मुंबईत शिवसैनिक अधिकच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. शिवसेनेच्या या विरोधावरून देखील आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. हनुमान चालीसेला शिवसेनेचा विरोध का? असा सवाल करत त्यांनी शिवसैनिक कायदा का हातात घेत आहेत. राणा दाम्पत्य आतंकवादी आहेत का? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार त्यांनी शिवसेनेवर केला आहे.


'पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये रात्रीस खेळ चाले' : पोलिसांच्या बदल्या आणि बढत्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये सरकारचा 'रात्रीस खेळ चाले' अशी गत आहे. यात अण्णा नाईक नेमका कोण आहे हे शोधण्याची गरज आहे. एकदा बदल्या झाल्या तर मग विनाकरण निर्णय कोणामुळे बदलेले जात आहेत. यात तुमच्यावर कुणाचा दबाव आहे की यात देखील कुणी तुमचा दलाल आहे, असा सवाल आशिष शेलार यांनी महविकास आघाडी सरकारला केला आहे.

हेही वाचा -Pune Load Shedding : पुणेकरांना बसणार का भारनियमनाचा शॉक? कशी आहे पुण्यातील भारनियमनाची परिस्थिती? जाणून घ्या

ABOUT THE AUTHOR

...view details