पुणेपुण्यासह राज्यभरात एनआयएने (NIA) छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. त्यानंतरपॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) वतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजी दरम्यान, पाकिस्तान जिंदाबादचे नारे (Slogans of Pakistan Zindabad) दिल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान, पीएफआयवर बंदी (ban PFI) घालण्याची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (bjp state president Chandrasekhar Bawankule) मागणी केली आहे. संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे (Offenses of sedition) दाखल करा, असंही ते म्हणाले.
ठाकरेंवर टिका आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वेदांत प्रकल्पावरून (vedanta-foxconn project) तळेगाव दाभाडे येथे आंदोलन करण्यात आले. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टिका केली असून ते म्हणाले की खोटं बोला पण रेटून बोला सुरू आहे हे आंदोलन खोटं आंदोलन आहे. माझा आदित्य ठाकरेंना सवाल आहे की, महविकास आघाडी सरकारने जर वेदांत बाबत एमओयू केलं असेल तर ते त्यांनी दाखवावा. तसेच जागेबाबत त्यांनी शासन निर्णयाची प्रत देखील दाखवावी. जर नसेल तर ते आंदोलन खोट आंदोलन करत आहे. मुख्यमंत्री 18 महिने मंत्रालयात न आल्यामुळे हा प्रकल्प बाहेर गेलं आहे. याला जबाबदार तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. अशी टिका यावेळी बावनकुळे यांनी केली.