पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइनच्या माध्यमातून जो संवाद साधला आहे. त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले की तो त्यांचा मनोगत आहे. यावर नो कॉमेंट. मी काहीही बोलू शकत नाही. हे जे काही शिवसेनेत चालले आहे, त्याच्याशी भाजपाचा ( BJP ) काहीही संबंध नाही. सरकार स्थापनेचा असा कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. आमच्या 13 जणांची कोअर कमिटी आहे. कोणत्याही प्रस्तावावर चर्चा झालेली नाही, असे यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP state president Chandrakant Patil ) म्हणाले. राज्यसभा आणि विधपरिषदेच्या निकालानंतर गुलाल उधळण्यात आला आहे. आत्ता विधानसभेची तयारी आहे का? यावर पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, की मी हा गुलाल आत्ता राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी शिल्लक ठेवला आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहे. यावर पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की आमच्याकडे एक पद्धत आहे. कोणतीही मोठी निवडणूक जिंकलो की दिल्लीत जाऊन पक्ष श्रेष्ठींना माहिती द्यावी लागते आणि त्यासाठी फडणवीस हे दिल्लीला गेले आहे. मी खूप दिवस मुंबईत राहिलो असल्याने मी इथ आलो आणि ते दिल्लीला गेले, असे देखील यावेळी पाटील म्हणाले. भुजबळ यांची साहित्यावरील हुकूमत ही आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला तसेच यंदा जो मुख्यमंत्री असेल तोच यंदा पांडुरंगाची पूजा करेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.