महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Chandrakant Patil on New Year 2022 : 'नया साल नई उमंग' म्हणत चंद्रकांत पाटलांची सत्तास्थापनेची आशा कायम

पुण्यात पत्रकार परिषद घेत आज त्यांनी अनेक मुदद्यांवरून राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनावरून देखील त्यांनी सरकारवर जोरदार शरसंधान साधलं आहे.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

By

Published : Dec 31, 2021, 10:39 AM IST

पुणे - राज्यातील सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता असून महाविकास आघडीमधील प्रत्येक पक्ष बाहेर पडून भाजपासोबत सरकार स्थापनेसाठी इच्छुक आहेत, असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. त्याचबरोबर त्यांनी 'नया साल नई उमंग' ( Chandrakant Patil on New Year 2022 ) असं म्हणत पुन्हा एकदा सरकार पाडण्याचे संकेत दिले आहेत.

'नया साल नई उमंग' म्हणत चंद्रकांत पाटलांची सत्तास्थापनेची आशा कायम

हिवाळी अधिवेशनावरुन ठाकरे सरकारवर जोरदार टीका -

पुण्यात पत्रकार परिषद घेत आज त्यांनी ( Chandrakanr Patil in Pune )अनेक मुदद्यांवरून राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनावरून देखील त्यांनी सरकारवर जोरदार शरसंधान साधलं आहे. या अधिवेशनात राज्यातला कुठलाच प्रश्न मार्गी लागला नाही. उलट सरकारला या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष अन काही निर्णय घेण एवढंच काम होत, काही निर्णय संख्याबळाच्या आधारावर करून घेतले. लोकांचे प्रश्न मार्गी लावणं हा हेतू त्यांचा नव्हता, अशी टीका करत अनेक मुदद्यांवर सरकारला घेरले.

अधिवेशनात कुठल्याच मुद्द्यांवर चर्चा नाही -

वीजबिल, कर्जमाफी यात गोंधळ आहे, हे प्रश्न देखील सरकारने मांडू दिले नाहीत. त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ज्यामुळ आंदोलन सुरू आहे, त्या एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न देखील मार्गी लावला नाही, असे सांगतच पेपरफुटीबाबत निर्णय घ्या, अशी मागणी देखील राज्य सरकारला केली आहे.

नितेश राणेंची अटक म्हणजे सरकारने कायद्याचा मांडलेला बाजार -

दरम्यान नितेश राणे यांच्या अटकेबाबत कायदा आम्हाला देखील मान्य आहे. मात्र अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करून राज्यात कायद्याचा बाजार या सरकारने मांडला असल्याचे सांगत प्रत्येक अधिकाऱ्यांचे फोन जर चेक केले तर सत्य सामोर येईल, असे देखील सांगितलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details