महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महाविकास आघाडी अत्यंत खोटारडे अन् थापाडे सरकार आहे - चंद्रकांत पाटील - पुणे राजकारण बातमी

महाविकास आघाडी सरकार हे अत्यंत खोटारडे सरकरा असून प्रत्येक विषयात थापा मारणारे सरकार आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेतील छायाचित्र
पत्रकार परिषदेतील छायाचित्र

By

Published : Aug 2, 2021, 3:15 PM IST

Updated : Aug 2, 2021, 3:45 PM IST

पुणे- खोटे बोलणारे सरकार कोणते असेल तर ते महाराष्ट्र विकास आघाडी आहे. प्रत्येक विषयात वेळ मारून न्यायची. प्रत्येक विषयात घोषणा करायची आणि त्याची अंमलबजावणी करायची नाही. हे या सरकारच काम आहे. अत्यंत खोटारडे, प्रत्येक विषयात थापा मारणार हे सरकार आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

बोलताना चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भागात मदत पाठवण्यात आली आहे. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मनसेशी युतीचा केंद्रीय राजकारणात काहीह परिणाम नाही

राज ठाकरे यांची क्लिप मला मिळाली असून मी ती ऐकली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात माझी भेट होणार आहे आणि आम्ही यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. राज ठाकरे यांच्याशी परप्रांतीयांच्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करणार आहोत. भविष्यात आमच्यात एकमत झाले तरी आम्हाला आमचे सहकारी व केंद्राची परवानगी घ्यावी लागणार आहे. कारण मनसेशी युतीचा केंद्रीय राजकारणात काहीही परिणाम होणार नाही. याचाही आम्हाला विचार करावा लागणार आहे. त्यानंतरच निर्णय घेता येईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मेट्रोच्या कार्यक्रमात मोदींचा फोटो नाही

मी मेट्रो कंपनीचा निषेध करतो. अशा पद्धतीने दबावाखाली काम करायचे असेल तर आम्हलाही दबाव तयार करता येतो. 11 हजारच्या मेट्रोत 6 हजारची गॅरंटी केंद्राने दिल्यानंतर कर्ज मिळाले. 11 हजार कोटीतील 8 हजार कोटी दिल्यानंतरही मेट्रोच्या ट्रायल रनच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचा फोटो नाही. एवढे राजकारण करणे चुकीचे आहे. लोकांना कळत नाही का की मेट्रो कोणी आणली, असे पाटील म्हणाले

2016 साली आमच्या बरोबर शिवसेना होती.राष्ट्रवादी नाही

यापुढे देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय मेट्रोचा कार्यक्रम झाला तर आम्ही होऊ देणार नाही. विशेषतः शेवटच्या कार्यक्रमात मेट्रोला मोदींना बोलवावेच लागेल, असेही यावेळी पाटील यांनी सांगितलं.

मी स्वतः व्यापाऱ्यांचे नेतृत्व करणार

मी स्वतः आता या शहरातील व्यापाऱ्यांचा नेतृत्व करणार आहे. व्यापाऱ्यांना जर याच्यात राजकारण नको असे वाटत असेल तर त्यांनी आंदोलन करावा. पण, व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे. दुकाने नियमितपणे उघडली पाहिजे. सरकारला दुकाने बंद ठेवायची असतील तर त्यांनी दुकानदाराला 25 हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी देखील यावेळी पाटील यांनी केली.

हेही वाचा -पुण्यात भरदिवसा गोळ्या घालून सराईत गुन्हेगाराची हत्या

Last Updated : Aug 2, 2021, 3:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details