पुणे- हिंगणघाट प्रकरणात पीडित शिक्षिकेच्या मृत्यूनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, तसेच हैदराबादप्रमाणे आरोपीला गोळ्या घालाव्या, अशी मागणी करत पुणे भाजपच्यावतीने अलका टॉकीज चौकात सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच यावेळी हिंगणघाट प्रकरणाचा निषेध करण्यात आला.
हिंगणघाट घटनेचा निषेध करत भाजपची पुण्यात सरकारविरोधात घोषणाबाजी
हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेचा सोमवारी मृत्यू झाला होता. त्यानंतर सामान्य नागरिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.
हिंगणघाट घटनेचा निषेध करत भाजपची पुण्यात सरकारविरोधात घोषणाबाजी
हेही वाचा -मैत्रिणींना फिरवण्यासाठी स्पोर्टबाईक चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक, 20 स्पोर्टबाईक जप्त
दरम्यान, हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेचा सोमवारी मृत्यू झाला होता. त्यानंतर सामान्य नागरिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करत भाजपने अलका टॉकीज चौकात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Last Updated : Feb 11, 2020, 1:34 PM IST