पुणे:एखाद्या वेळेस आई- वडिलांना शिव्या द्या, परंतु मोदी आणि शाहांना शिव्या दिलेला आम्हाला सहन होत नाहीत. मलाही होत नाहीत, असं वक्तव्य जाहीर भाषणात उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील bjp minister chandrakant patil यांनी पुण्यात केला आहे.
आई- वडिलांवरुन शिव्या द्या, पण मोदी-शाहांबद्दल शिव्या सहन करु शकत नाही; चंद्रकांत पाटलांचे जाहीर विधान - उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील
BJP Minister Chandrakant Patil: एखाद्या वेळेस आई- वडिलांना शिव्या द्या, परंतु मोदी आणि शाहांना शिव्या दिलेला आम्हाला सहन होत नाहीत. मलाही होत नाहीत, असं वक्तव्य जाहीर भाषणात उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील bjp minister chandrakant patil यांनी पुण्यात केला आहे.
एक मिशन देण्यात आलंपुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर पुणे भाजपाच्या वतीने उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत दादा पाटील आपल्या भाषणात बोलत होते. 2019 ला मला पुण्यात अचानक आणलं गेलं नाही. आम्हाला एक मला एक मिशन देण्यात आलं होतं .आणि त्या मिशनमध्ये सांगली, कोल्हापूर, म्हाडा इथून विरोधी पक्षाला आपण पूर्णपणे साफ केलं. आता पुणे राहिलं होतं, पण कोविड आणि इतर कारणांमुळे ते करता आलं नाही, असं चंद्रकांत दादा पाटील म्हणाले आहेत.
मोदी आणि शहाणा शिव्या दिलेल्या आम्हाला चालत नाहीत्याच संदर्भात बोलताना हातकंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी नेहमी म्हणायचे की, मला कोण हरवू शकतो. आणि ते रोज मोदी आणि शाहांना शिव्या घालायचे. मी त्यांना म्हटलं की तुम्ही चुकत आहे. तर ते मला कोणी हरवू शकत नाही, अशा भावात होते. पण ते हारले त्या संदर्भात राजू शेट्टी एका केंद्रीय नेत्यांना सांगितले की दादाने मला संपवलं. परंतु, त्या केंद्र नेत्याने सांगितले दादा कुणाला संपतवत नाही. एखाद्या वेळेस आई- वडिलांना शिव्या दिल्या तरी चालतील. परंतु मोदी आणि शहाणा शिव्या दिलेल्या आम्हाला चालत नाहीत. आम्ही त्यांचा पराभव केला असे आश्चर्यकारक वक्तव्य उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पुण्यात केला आहे. 2019 ला चंद्रकांत दादा पाटील भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यावेळेस परिस्थितीवर बोलताना त्यांनी हे विधान केलेलं आहे.