महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजपचा पुणे शहरासाठीचा जाहीरनामा : नव्या बाटलीत जुनीच दारू - bjp manifest

भाजपने २०१४ चाच जाहीरनामा नव्या स्वरूपात मांडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपचा पुणे शहरासाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना

By

Published : Apr 17, 2019, 10:04 PM IST

पुणे - भारतीय जनता पक्षाचे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार गिरीश बापट यांनी त्यांचा जाहीरनामा बुधवारी प्रसिद्ध केला आहे. यावेळी बापट यांनी पुण्याला योग सिटी आणि स्मार्ट सिटी करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यातून पुणेकरांना दिले आहे. त्याप्रमाणेच पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवून पुणेकरांना लवकरच २४ तास आणि समान पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

भाजपचा पुणे शहरासाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना


यापूर्वीच मंजुरी मिळालेल्या किंवा प्रस्तावित असलेल्या हायपर लूप, मेट्रो रेल्वेचे जाळे निर्माण करणे, पुरंदर विमानतळ, लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण, रिंग रोड, ट्रान्झिट हब मुळा-मुठा नदी पात्रातून जलवाहतूक, आदी प्रकल्पांची उजळणी ही भाजपने जाहीरनाम्यांमध्ये केली आहे. त्यामुळे भाजपने २०१४ चाच जाहीरनामा नव्या स्वरूपात मांडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details