महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BJP Leader Kirit Somaiya : उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयाचे कसाबशी संबंध, किरीट सोमैया यांचा आरोप - उद्धव ठाकरे

मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्यात पोलिसांनी परिधान केलेले बुलेटप्रुफ जॅकेट निकृष्ठ होते. त्यानंतर बुलेटप्रुफ जॅकेट घोटाळ्याप्रकरणी बिमल जाधव यांना शिक्षा झाली आहे. बिमल अग्रवाल यांच्या ज्या कंपनीत हे निकृष्ठ जॅकेट तयार होत होते, त्याचे भागीदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Minister Uddhav Thackeray ) यांचे निकटवर्तीय यंशवत जाधव हे आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्या साथीदाराचे कसाबशी संबंध असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केले आहे.

किरीट सोमैया
किरीट सोमैया

By

Published : May 24, 2022, 11:33 AM IST

पुणे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या साथीदाराचे ( Minister Uddhav Thackeray ) संबंध कसाबशी असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया ( BJP Leader Kirit Somaiya ) यांनी केला आहे. यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. जाधव यांनी सुमारे एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही सोमैया यांनी केला आहे. पुण्यात भाजप पक्ष कार्यालयात ते बोलत होते.

बोलताना भाजप नेते किरीट सोमैया

80 कोटी रुपयांची मलबार हिल येथील एक मालमत्ता विकत -शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या 53 इमारती आयकर विभागाने बेनामी संपत्ती म्हणून घोषित केल्या आहेत. यशवंत जाधव हे बिमल कुमार, रामगोपाल अग्रवाल यांचे भागीदार आहेत. बिमल अग्रवाल यांचा बुलेटप्रुफ जॅकेट घोटाळा जग प्रसिद्ध आहे. मुंबईत झालेल्या 26/11 हल्ल्याच्यावेळी हा घोटाळा उघडकीस आला होता. बिमल अग्रवाल आणि यशवंत जाधव सोबत यांनी भागीदारीत कंपनी सुरू केली. त्या कंपनीचे नाव समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्स, असे आहे. समर्थ इरेक्टर्स आणि डेव्हलपर्स या भागीदारी कंपनीने बद्री इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा.लि.कडून 80 कोटी रुपयांची मलबार हिल येथील एक मालमत्ता विकत घेतल्याचा आरोपही सोमैयांनी यावेळी केला.

14 रुपये वाढवून दीड रुपया कमी करताय - सोमैया यांना महागाईवर विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याच्या जनतेला मूर्ख समजत आहेत. लूटमार करायची म्हणून तुम्हाला सरकारच्या तिजोरीत पैसे हवे. हे पैसे मेट्रोच्या कामासाठी नाही तर त्यांना वसुली साठी हवे आहे. मोदी सरकारने जो 4 वर्षात 19 रुपये कर वाढवला तो पूर्ण कर कमी केला आहे. देशातील जनतेला दिलासा दिला आहे. पण, राज्य सरकारने या दोन वर्षात 14 रुपये पेट्रोल डिझेलमध्ये वाढ केली. पेट्रोल डिझेल हा जीएसटीमध्ये येत नाही. 14 रुपये वाढवून दीड रुपया कमी करत आहे, अशी टिका यावेळी सोमैया यांनी ठाकरे सरकारवर केली.

अनिल परब यांचे हॉटेल पाडले जाईल -शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांचे हॉटेल केंद्रीय पर्यावरण विभागाकडून या आठवड्यात पाडले जाईल. त्या हॉटेलचे वीज व पाण्याचे कनेक्शन कापण्यात यावे, अशी विनंती रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना केल्याचेही सोमैया यांनी सांगितले.

हसन मुश्रीफवर कारवाई -मंत्री हसन मुश्रीफ यांनी 158 कोटींची मनिलाँड्रींग केली आहे. 16 कोटी 31 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांकडून जमा केली की स्वतःच्या नावाने, असा प्रश्न शरद पवार यांनी मुश्रीफ यांना विचारावा, असेही सोमैया म्हणाले.

हेही वाचा -Pune Crime News : पुण्यात दिव्यांग अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन दारु पाजून केले अश्लिल कृत्य

ABOUT THE AUTHOR

...view details