महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पूजा चव्हाण प्रकरणात पहिल्या दिवसांपासूनच पुणे पोलिसांच्या हालचाली संशयास्पद, चित्रा वाघ यांचा आरोप - चित्रा वाघ

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये तो आवाज संजय राठोड यांचा असल्याचे आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो आहोत. या प्रकरणावर आम्ही विविध प्रश्न उपस्थित केले. परंतु अजूनही आम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे पोलिसांकडून मिळालेली नाहीत. पहिल्या दिवसांपासूनच या प्रकरणात पुणे पोलिसांच्या हालचाली संशयास्पद असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला.

Pooja Chavan suicide case
Pooja Chavan suicide case

By

Published : Aug 2, 2021, 10:25 PM IST

Updated : Aug 2, 2021, 10:37 PM IST

पुणे -पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये तो आवाज संजय राठोड यांचा असल्याचे आम्ही सुरुवातीपासून सांगत आलो आहोत. या प्रकरणावर आम्ही विविध प्रश्न उपस्थित केले. परंतु अजूनही आम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे पोलिसांकडून मिळालेली नाहीत. पहिल्या दिवसांपासूनच या प्रकरणात पुणे पोलिसांच्या हालचाली संशयास्पद असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला.

दरम्यान आज सकाळपासून पूजा चव्हाण आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव चर्चेत आहे. पूजा चव्हाणच्या फोन कॉल्स रेकॉर्डिंगवरून मृत्यूच्या आधी ती ज्या व्यक्तीसोबत संपर्कात होती ती व्यक्ती संजय राठोडच असल्याची प्रथम दर्शनी माहिती समोर येत आहे. बंजारा भाषेत त्या दोघांमध्ये संभाषण झालं असल्याचं बोललं जातंय. माध्यमांमध्ये या बातम्या आल्यानंतर संजय राठोड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या सर्व प्रकरणावर चित्रा वाघ यांनी ही प्रतिक्रिया दिली.

भाजप नेत्या चित्रा वाघ
चित्रा वाघ म्हणाल्या, पूजा चव्हाणचे आई-वडील जरी या प्रकरणात कोणाविरोधात तक्रार नसल्याचे सांगत असले तरी, ते कोणत्या परिस्थितीतून जात आहेत हे आम्ही समजू शकतो. पूजा चव्हाणचा मृत्यू झाल्याच्या दिवशीचे झालेलं संभाषण सार्वजनिक झाले तर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस येईल. परंतु इतके सारे पुरावे असतानाही पुणे पोलीस याकडे कानाडोळा करत आहेत. व्हायरल ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच असल्याचे लहान पोरगंही सांगेल, असे म्हणत चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
मूळची बीडची असलेल्या पूजा चव्हाण हिने 6 फेब्रुवारी रोजी पुण्यातील वानवडी परिसरात राहत असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे म्हटलं जातंय. याप्रकरणानंतर माजी मंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेले. पूजा सोबत संबंध असल्याच्या आरोपावरून राठोड यांना वन मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान याप्रकरणी आम्ही पुण्यातील परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की या प्रकरणात इतक्यात कोणतीही अपडेट नाही. मात्र पोलीस अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Last Updated : Aug 2, 2021, 10:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details