पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बुधवारी (दि. 23 मार्च) प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, आमच्यात वैचारिक विरोध असू शकतो. पण, एक महिला म्हणून मला असे वाटते की महिलेलाच वेगळा न्याय का दिला जातो. त्यांच्याच पक्षातील पुरुष प्रदेशाध्यक्ष हे एक कॅबिनेट मंत्री आहे. एक व्यक्ती एक पद असा नियम फक्त पक्षातील महिलांसाठीच का, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. पुण्यात भारतीय जनता पक्ष कार्यालयात भाजप नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
Chitra wagh criticism on NCP : महिलेलाच वेगळं न्याय का, चित्रा वाघ यांचे रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर भाष्य - भारतीय जनता पक्ष
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी बुधवारी (दि. 23 मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष या पदाचा राजीनामा दिला. एक व्यक्ती एक पद, हा नियम केवळ महिलांसाठीच का, असा सवाल उपस्थित करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी पक्षावर टीका केली. त्या पुण्यात बोलत होते.
शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्या मुलींनी राज्य महिला आयोगाकडे जी तक्रार दिली आहे. त्यावर देखील वाघ म्हणाल्या की त्या मुलीने नारकोटेस्टची मागणी पुणे पोलिसांकडे केली आहे. पण, तसा काही प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही. मी कोणत्याही चौकशीला तयार आहे. राज्यातील कोणत्याही मुलीवर अशा पद्धतीने अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. एक पूजा चव्हाण झाली दुसरी होऊ देणार नाही, असेही यावेळी वाघ म्हणाल्या. पुणे पोलिसांच्या वर्दीतही एक बाप आहे. कोणीतरी कुठंतरी विचारेल. किती लोकांची आवाज तुम्ही दाबावणार, असा प्रश्न उपस्थित करत आम्ही सत्याच्या बाजूने नेहमी आहे व त्यासाठी आम्ही लढणार, असा इशाराही वाघ यांनी यावेळी दिला.
हेही वाचा -Pravin Darekar Criticized Sunil Raut :...म्हणून सुनील राऊतांनी शिव्या घातल्या - प्रविण दरेकर