पुणे -शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात आणखी एका महिलेने लैंगिक छळ केल्याची तक्रार केली आहे. पीडित महिलेने या प्रकरणी यवतमाळ पोलिसांना पोस्टाद्वारे पत्र पाठवून तक्रार दिली आहे. या प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने भाजपा नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाले आहे. त्यांनी गृहमंत्री आणि आणि राज्य सरकारला धारेवर धरले आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
चित्रा वाघ म्हणाल्या, यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांनी अशा प्रकारची नेहमी तक्रार आल्याचे सांगितले. परंतु अद्याप त्यावर त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 24 तासात अशाप्रकारच्या तक्रारीवर कारवाई करणे अपेक्षित असताना यवतमाळ पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. यवतमाळ पोलिसांना सुप्रीम कोर्टाचे नियम लागू होत नाहीत का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. संजय राठोड यांच्यावर नव्याने झालेल्या आरोपानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत अशा प्रकारच्या आरोप केवळ टीआरपीसाठी होत असल्याचे म्हटले होते. यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, ही कसली मग्रुरी, हा तर सत्तेचा माज आहे. तक्रारीत आरोपींचे स्पष्ट नाव आहे, तिने त्यात घडलेला प्रकार सांगत पीडितीने मदतीची मागणी केली. त्यामुळे यवतमाळ पोलीस आता काय कारवाई करतात हे बघायचे असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता पुन्हा निशाण्यावर