पुणे - विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. महाराष्ट्रातील ड्रग्ज माफिया देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर चालतो, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. त्यावर फडणवीस यांनीही उत्तरे दिली आहेत. याप्रकरणी आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिकांचा समाचार घेतला असून मलिक यांच्याकडे राज्याच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी काही नाही, त्यामुळे ते बेछुट आरोप करत असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
हेही वाचा -Diwali 2021 : आज वसुबारस! 'या' कारणांमुळे साजरा केला जातो हा दिवस
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक हे बेछूट आरोप करत आहेत. त्यांनी समीर वानखेडेवर आरोप करत असताना त्यापासून होणाऱ्या परिणामांची काळजी करावी. पण, त्यांना यात भारतीय जनता पक्ष आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना ओढण्याचे खूप परिणाम भोगावे लागतील. कारण, पुराव्याशिवाय बोलल्यानंतर पुरावे नाही सापडले तर, परिस्थिती खूप खराब होते. सरकार प्रत्येक वेळी असा चेहेरा उभा करते की, त्या चेहेऱ्यापासून सामान्य माणसाचे प्रश्न विचलित केले जातात. राज्याच्या प्रश्नांकडे त्यांच्याकडे काही बोलण्यासाठी नसल्याने ते बेछूट आरोप करत आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
संध्याकाळ पर्यंत काय होईल ते कळेलच