पुणे - ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अप्रत्यक्ष समर्थन केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक किती करणार आहोत? असा सवाल या निमित्ताने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही वाचा -2024 ची निवडणूक देशासाठी निर्णायक, मोदींचा पराभव न झाल्यास लोकशाही संपेल : पृथ्वीराज चव्हाण
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक किती करणार आहोत, याचा विचार करायला हवे
नाशिक येथील साहित्य संमेलनाला काल तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी गालबोट लागले. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर साहित्य संमेलनस्थळी शाई फेकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. संभाजी ब्रिगेडने ही शाईफेक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, माझी प्रतिक्रिया ही पहिल्या कृतीवर आहे. गिरीश कुबेर हे खूप मोठे लेखक आहेत. शाही फेकून निषेध व्यक्त करणे हे न समाजण्यासारखे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर असेल यांच्या प्रती लोकांची टोकाची श्रद्धा आहे. त्या श्रद्धा दुखवण्याचा अधिकार कोणाला दिलेला नाही. आणि जरी पद्धत चुकीची असली तरी या देशात हे खूपच चाललेले आहे. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक किती करणार आहोत, याचा विचार करायला हवा, असे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.
शेवटच्या दिवशी साहित्य संमेलनाला गालबोट
साहित्य संमेलनाचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. मात्र, शेवटच्या दिवशी साहित्य संमेलनाला गालबोट लागले आहे. पोलिसांचा बंदोबस्त असतानाही गिरीश कुबेर यांच्यावर हा भ्याड शाईहल्ला करण्यात आला आहे. संमेलनस्थळी गिरीश कुबेर दाखल होत असताना हा हल्ला करण्यात आला. त्यामुळे, शेवटच्या दिवशी संमेलनाला गालबोट लागल्याचे दिसून आले आहे. हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने गिरीश कुबेर यांना सुरक्षितपणे सभागृहात पोहोचवले. हा हल्ला करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा -Etv Bharat Special - वाचा... गावातील पहिल्या पदव्युत्तर मुलीचा संघर्ष