महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यातील आठही मतदारसंघावर भाजपचा दावा; इच्छुकांच्या घेतल्या मुलाखती - girisha bapat in pune

शहरातील आठही विधानसभा मतदारसंघ लढवण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. पक्ष नेतृत्वाकडे या आठही जागांवर भाजपचाच दावा असल्याचेही सांगितले जाणार असल्याचे भाजप शहर अध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

इच्छुकांच्या घेतल्या मुलाखती

By

Published : Aug 29, 2019, 11:06 PM IST

पुणे- शहरातील आठही विधानसभा मतदारसंघ लढवण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. पक्ष नेतृत्वाकडे या आठही जागांवर भाजपचाच दावा असल्याचेही सांगितले जाणार असल्याचे भाजप शहर अध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले. सध्या या आठही जागा भाजपकडे आहेत. शिवाय येथे सक्षम उमेदवार असल्याने या जागांवर दावेदारी करत असल्याचे मिसाळ म्हणाल्या. उमेदवारी कोणाला द्यायची याबाबतचा निर्णय पक्षनेतृत्व घेईल, असे मुलाखतीला उपस्थित असलेले खासदार गिरीश बापट यांनी स्पष्ट केले.

आठही मतदारसंघावर भाजपचा दावा

युतीबाबतचा निर्णय तसेच कुठल्या जागा कोणी लढवायचा याबाबतचा सर्वस्वी निर्णय पक्षनेतृत्वावर अवलंबून आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान जी चर्चा होईल आणि जे जागावाटप होईल त्यावर अंमलबजावणी करू, असेही देखील मिसाळ म्हणाल्या. पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी घेण्यात आल्या. पक्षनिरीक्षक आशिष शेलार यांच्या उपस्थितीत या मुलाखती झाल्या. त्यानंतर माधुरी मिसाळ बोलत होत्या. आठही विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल 103 इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सर्वाधिक इच्छुकांची संख्या ही शिवाजीनगर मतदारसंघात आहे. तब्बल 30 जणांनी शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याखालोखाल कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून 21, कोथरूड विधानसभा मतदारसंघातून 14, खडकवासला विधानसभा मतदारसंघातून 11, हडपसर व कसबा विधानसभा मतदारसंघातून 9, वडगाव शेरी मधून 5 तर पर्वती मतदारसंघातून 4 उमेदवार निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे पक्षनिरीक्षकांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details