पुणे -माझ्या पक्षाने जर मला मुख्यमंत्री व्हा असे सांगितले, तर मी काय सोडणार आहे का? असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. शुक्रवारी पुण्यात झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
तर मी मुख्यमंत्री देखील होईल - पाटील

मला कुठलीही अतिरिक्त इच्छा-आकांक्षा नाही. पक्ष म्हणेल ते काम मी करत असतो. पक्षाने निवडणूक लढवायला सांगितली तर निवडणूक लढवेल, पक्ष ज्या ठिकाणाहून सांगेल तिथून मी लढेल. माझी तयारी आहे. असे सांगताना पाटील यांनी पक्षाने मुख्यमंत्री बनण्यास सांगितले तर तयार आहात का? असे विचारले असता, मग काय सोडणार का? असा प्रतिप्रश्न केला. पक्षाने मुख्यमंत्री पद दिले तर मी मुख्यमंत्री देखील होईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा
पुन्हा काही नेते भाजपच्या वाटेवर; शरद पवारांनी मानसिक तयारी ठेवावी - चंद्रकांत पाटील