महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bitcoin cheating case: रवींद्र पाटील याने ७५ कोटींचे २४० बिटकॉईन केले लंपास - बिटकॉईन घोटाळा आयपीएस अधिकारी

पुण्यात काही दिवसांपूर्वी बिटकॉइन या आभासी चलनाच्या हेराफेरी ( Bitcoin cheating case ) प्रकरणी पुणे पोलिसांनी एका पोलीस अधिकाऱ्याला अटक केली होती. त्या गुन्ह्यात आता केपीएमजी कंपनीचा भागीदार आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील ( Bitcoin cheating case Former IPS Ravindra Patil ) यानेच ७५ कोटींचे जवळपास २४० बिटकॉईन लंपास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Bitcoin cheating case Pankaj ghode
बिटकॉईन

By

Published : Mar 26, 2022, 8:58 AM IST

पुणे -पुण्यात काही दिवसांपूर्वी बिटकॉइन या आभासी चलनाच्या हेराफेरी ( Bitcoin cheating case ) प्रकरणी पुणे पोलिसांनी एका पोलीस अधिकाऱ्याला अटक केली होती. त्या गुन्ह्यात आता केपीएमजी कंपनीचा भागीदार आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील ( Bitcoin cheating case Former IPS Ravindra Patil ) यानेच ७५ कोटींचे जवळपास २४० बिटकॉईन लंपास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा -VIDEO : गुढीपाडव्यानिमित्त साखरगाठीच्या तयारीला सुरुवात

पोलिसांनी आतापर्यंत त्याच्याकडून जवळपास सहा कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त केले असून, त्याने काही बिटकॉईन आपल्या पत्नीच्या आणि भावाच्या नावावर देखील वळवल्याचे उघड झाले आहे.

काय आहे नेमक प्रकरण -देशभरात गाजत असलेल्या आभासी चलनाच्या घोटाळ्याच्या तपासासाठी सायबर तज्ज्ञ म्हणून पुणे पोलिसांनी पंकज प्रकाश घोडे आणि रवींद्र प्रभाकर पाटील यांची तपासासाठी नियुक्ती केली होती. या प्रकरणाची तपासणी करत असताना अटक केलेल्या आरोपींकडून डेटा मिळवत त्या डेटाचा गैरवापर करत या दोघांनी परस्पर बिटकॉईन घेतले होते. आणि आता रवींद्र पाटीलने या प्रकरणाचा तपास करत असताना जवळपास २४० बिटकॉईन घेतले असल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा -Varsha Gaikwad : राज्यातील शाळांमधील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार - वर्षा गायकवाड

ABOUT THE AUTHOR

...view details