पुणे - पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि अहमदनगर येथे दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारासह अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. दोन करवाईमध्ये तीन अल्पवयीन आणि एका सराईत गुन्हेगाराचा समावेश आहे. त्यांच्याकडून एकूण 10 लाख 55 हजाराच्या 25 दुचाकी भोसरी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड, पुणे, पुणे ग्रामीण, अहमदनगर, नाशिक ग्रामीण परिसरातील 22 गुन्हे उघडकीस आले आहेत. याप्रकरणी अजित अमृता साबळे (वय 25, रा. मरवेशी) याला अटक करण्यात आली आहे.
साथीदार अल्पवयीन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीचे वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे यांनी उपनिरीक्षक सिद्धेश्वर कैलासे आणि महेंद्र गाढवे यांची दोन पथके तयार केली. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांच्या पथकातील पोलीस शिपाई चेतन साळवे यांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी त्याच्या अल्पवयीन साथीदारास पोलिसांनी ताब्यात घेतले.
18 दुचाकी चोरल्याचे निष्पन्न
त्या दोघांकडून पिंपरी चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर ग्रामीण व नाशीक ग्रामीण परीसरातून चोरलेल्या एकूण 18 महागडया दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. जप्त गाड्यापैकी 11 गाड्या अकोले या परिसरात ठेवल्या होत्या. पोलिसांनी अकोले येथून त्या दुचाकी हस्तगत केल्या. या कारवाईमुळे 17 गुन्हे उघडकीस आले आहेत.
सात दुचाकी जप्त
सहायक पोलीस निरीक्षक कैलासे यांच्या पथकाने दोन अल्पवयीन वाहन चोरांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात दुचाकी जप्त केल्या असून पाच गुन्हे उघडकीस आलेत. एकूण 25 दुचाकी भोसरी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
कोणत्या परिसरातील गुन्हे?
दोन्ही कारवायांमध्ये भोसरी 4, सांगवी 2, चाकण 2, चिखली 1, विश्रांतवाडी 1, खडक 2, नारायणगाव 2, आळेफाटा 1, आकोले 2, संगमनेर 1, राजूर 1, घोटी 1, कोथरूड हद्दीतून चोरलेली 1, राजुर 1 असे 22 गुन्हे उघडकीस आले असून 3 दुचाकींबाबत पोलिसांचा शोध सुरू आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप पोलीस आयुक्त मंचक इप्पर, सहायक सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिद्धश्वर कैलासे, उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, नामदेव तळवडे, कर्मचारी चंद्रकांत तिटकारे, अजय डगळे, गणेश हिंगे, पोलीस शिपाई बाळासाहेब विधाते, सागर जाधव, सागर भोसले, चेतन साळवे, अशोक ताथवडे, संतोष महाडीक, समीर रासकर, आशिष गोपी, सुमीत देवकर, गणेश सावत यांच्या पथकाने केली आहे.