महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

हर हर महादेव.. भीमाशंकराची पहिल्या सोमवारीची पहिली आरती, पाहा व्हिडिओ - bhimashankar

आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने आरतीसाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली आहे.

आरती

By

Published : Aug 5, 2019, 7:37 AM IST

Updated : Aug 5, 2019, 8:03 AM IST

पुणे- बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या भीमाशंकर मंदिरात आज(सोमवार) पहाटे शिवलिंगाची आरती करण्यात आली. यावेळी भीमाशंकराच्या मुख्य पिंडीचे पूजन करून घंटा, डमरू ,शंक वाजवत शंभू महादेवाच्या मंदिरात श्री गणेशाची आरतीने सुरुवात करण्यात आली. आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली आहे.

पहिल्या सोमवारीची पहिली आरती

देशभरातून आलेल्या भाविकांनी या आरती दरम्यान हर हर महादेव, बम बम भोले, ओम नमः शिवाय म्हणत संपूर्ण जंगल परिसरात जयघोष केला.

जंगल परिसरातील या भीमाशंकराच्या दर्शनाला आलेल्या भाविकांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळाला. थंडगार वातावरण, पांढरेशुभ्र शुभ्र धुके यामध्ये हा वेढलेला परिसर असताना भाविकांमध्ये शंभू महादेवाच्या भक्तीचा महासागर ओसंडत होता.

Last Updated : Aug 5, 2019, 8:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details