महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bharat Biotech in Pune : पुणे तिथे काय उणे, आता भारत बायोटेक पुण्यात करणार लस निर्मिती - Pune Municipal Corporation

सीरम इन्स्टिट्यूटनंतर आता भारत बायोटेक पुण्यातील आपल्या मांजरी येथील प्रकल्पात कोरोना प्रतिबंधक लस निर्मिती करणार ( Bharat biotech Covaxin ) आहे. याबाबतची तयारी पूर्ण झाली असून येत्या पंधरा दिवसांत प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे. उत्पादन सुरू झाल्यावर पाण्याची गरज भासणार असल्याने पुणे महापालिकेला दररोज सात ते आठ टँकर पाणीपुरवठा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

file photo
file photo

By

Published : Jan 19, 2022, 5:14 PM IST

पुणे - मांजरी येथील भारत बायोटेक ( Bharat Biotech Covid Vaccine ) कंपनीच्या प्रकल्पातून कोरोना प्रतिबंधक लशींची निर्मिती करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या ( The Central Drugs Standard Control Organization ) पथकाकडून पाहणी करण्यात आली असून येत्या १५ दिवसांत प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे. उत्पादन सुरू झाल्यावर पाण्याची आवश्यकता भासणार असल्याने कंपनीकडून आणखी पाण्याची मागणी करण्यात आली आहे.

या कंपनीमध्ये उत्पादनाची रंगीत तालीम झाली आहे. कोरोना प्रतिबंधक लशींचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यापूर्वी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था आणि राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकांकडून नुकतीच पाहणी करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख ( Pune Collector Dr. Rajesh Deshmukh ) म्हणाले, ‘या कंपनीमध्ये लशींच्या निर्मितीसाठी आवश्यक ती तयारी झाली आहे. प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाल्यावर पाण्याची गरज भासणार आहे. पुणे महापालिकेने ( Pune Municipal Corporation ) दररोज सात ते आठ टँकरने पाणीपुरवठा करण्याची सूचना यापूर्वी देण्यात आली आहे. वीजपुरवठा, पर्यावरणविषयक परवानगी, जागेचे हस्तांतरण, करारनामे आदी प्रशासकीय पातळीवरील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. कंपनीकडून मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीची तयारी पूर्ण झाली आहे. कंपनीतून सुमारे साडेसात कोटी लशींचे उत्पादन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या १५ दिवसांत प्रत्यक्ष उत्पादन सुरू होऊ शकणार आहे.’

भारत बायोटेक ( Bharat Biotech in Pune ) कंपनीतून कोरोना प्रतिबंधक लशींच्या निर्मितीची तयारी पूर्ण झाली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था आणि राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकांकडून पाहणी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यापूर्वी अंतिम मान्यतेसाठी कंपनीकडून अर्जही करण्यात आला आहे. तसेच पाण्याची आणखी मागणी करण्यात आली असून, पाणीपुरवठा करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details