महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Crime News : संतापजनक ! कबुतर चोरल्याच्या संशयावरुन मुलाला बॅट आणि पट्ट्याने मारहाण - pune marathi news

पुण्यात कबुतर चोरल्याच्या संशयावरुन एका अल्पवयीन मुलाला मारहाण केली ( Pune Minor Boy Beat ) आहे. याप्रकरणाचा व्हिडिओ समाजमाध्यमांत प्रसारित झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला ( Yerwada Police Register Fir ) आहे.

minor boy
minor boy

By

Published : Feb 17, 2022, 6:52 PM IST

Updated : Feb 17, 2022, 7:52 PM IST

पुणे -कबुतर चोरल्याच्या संशयावरून पुण्यातील येरवडा परिसरामध्ये अल्पवयीन मुलाला दोन अल्पवयीन मुलाने बॅट आणि पट्ट्याने मारहाण केल्याची घटना घडली ( Pune Minor Boy Beat ) आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला ( Yerwada Police Register Fir ) आहे.

याबाबात सविस्तर माहिती अशी की, येरवडा परिसरात असलेल्या औद्योगिक शाळेमध्ये अल्पवयीन मुलगा खेळण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी त्याचे दोन अल्पवयीन मित्र आले. तेव्हा त्यांनी तू आमचे कबुतर चोरले म्हणून अल्पवयीन मुलाला बेल्ट आणि पट्ट्याने नग्न करुन मारहाण केली. हा सर्व प्रकार मारहाण करणाऱ्या मुलांनी समाजमाध्यमांत व्हायरल केला. या मुलाला मारहाण होत असताना अन्य मुले पाहत होते. मात्र, त्याला सोडवण्यासाठी कोणीही गेलं नाही. मारहाण झाल्यानंतर मुलगा घरी गेला. त्याने याबाबत कोणतीही माहिती घरच्यांना दिली नाही.

प्रतिक्रिया

दरम्यान, समाजमाध्यमांत व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर घरच्यांनी पाहिला. घरच्यांनी मुलाला सर्व प्रकार विचारल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.

हेही वाचा -Congress Criticized BJP Over PM Statement : ...म्हणून फडणवीस यांच्या घरी पत्रांचा भडीमार करणार - नाना पटोले

Last Updated : Feb 17, 2022, 7:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details