पुणे -महाराष्ट्र नवनर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला एका अज्ञातकडून धमकी ( MNS leader Vasant More son threatened ) दिल्याची घटना घडली आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार ( Filed a complaint at Bharati University Police Station ) दाखल केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढिवसानिमित्त ( MNS president Raj Thackeray birthday ) प्रभागात झालेल्या रोजगार मेळाव्याची रुपेश मोरे यांनी सर्व तयारी केली होती. यावेळी रुपेश याची गाडी कार्यक्रम स्थळी लावली होती. त्यावेळी अज्ञाताने त्यांच्या गाडीवर वायफरम्ये सावध रहा रुपेश अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती.
याच दरम्यान कोणी तरी त्यांच्या गाडीच्या वायफर मध्ये सावध रहा रुपेश अशी चिठ्ठी लावून ठेवली होती. जी मोरे यांनी रात्री बघितली. या प्रकरणी मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशमध्ये तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे हे मनसे चे माजी शहराध्यक्ष होते. पक्षाने भोंग्यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर मोरे यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. यानंतर पक्षातील अंतर्गत गटबाजीचा फटका मोरे यांना बसला असून पुणे शहर मनसेत दोन गटबाजी पडलेली पाहायला मिळाली. पक्षातील अंर्तगटबाजीमुळे वाढलेल्या वादातून अज्ञाताने मोरे यांना धमकी दिल्याच्या चर्चा सध्या मनसे कार्यकर्यांनमध्ये सुरू आहे.
दरम्यान, मनसेच्या पुणे संघटनेत सध्या अंतर्गत वाद सुरू आहेत. पुण्याचे माजी शहराध्यक्ष, सध्याचे मनसे सरचिटणीस असलेले वसंत मोरे यांच्यावर अन्याय होत असल्याच्या बातम्या सध्या समोर येत आहेत. त्यामुळेच मोरे समर्थक नाराज होऊन मनसेचा राजीनामा देत आहेत. असाच एक राजीनामा काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांचे खंदे समर्थक निलेश माझिरे यांनी दिला. यावेळी माझीरे यांनी पक्षांतर्गत काही वादांमुळे आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले होते.