बारामती -बारामतीत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन दिवस बाजार पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला बाजार समिती आवारातील कर्मचारी, व्यापारी, अडते, हमाल, मापाडी यांनी विचारविनिमय करून बाजार समिती दोन दिवस पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १९ एप्रिल आणि २० एप्रिल रोजी भुसार, तेलबिया, अन्य बाजार बंद राहणार आहे. अशी माहिती बाजार समितीचे सभापती वसंतराव गावडे यांनी दिली.
बारामती बाजार समिती राहणार 2 दिवस बंद फळे व भाजीपाला मार्केट नेहमीप्रमाणे सुरू
या कालावधीत धान्य बाजार आवाराचे गेट बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल पुढील आदेश येईपर्यंत विक्रीस घेऊन येऊ नये, असे आवाहान बाजार समितीकडून करण्यात आले आहे. बाजार समितीच्या आवारात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धान्य बाजार आवारात किरकोळ विक्रीची सर्व दुकाने दोन दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी केले आहे. मात्र फळे व भाजीपाला मार्केट नेहमीप्रमाणे सुरू राहील असेही जगताप यांनी सांगितले.
हेही वाचा -'फडणवीसांनी रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी दिल्लीत बसावे' - महसूल मंत्री बाळासाहोब थोरात