बारामती - बारामतीचा सुपुत्र अभिषेक सतीश ननवरे याने दक्षिण आफ्रिका येथे संपन्न झालेली "आयर्नमॅन" स्पर्धा पूर्ण करत एका नवीन विक्रमाची नोंद केली आहे. ग्रामीण भागातील सर्वाधिक कमी वयाचा आयर्नमॅन होण्याचा विक्रम अभिषेकने केला आहे. आयर्नमॅन होण्यासाठी निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेत ही स्पर्धा पूर्ण करत "आयर्नमॅन " हा जगविख्यात मानला जाणारा मानाचा किताब मिळविला आहे.
Aryanman competition : बारामतीच्या सुपुत्राने आयर्नमॅन स्पर्धा केली 13 तासात पूर्ण - बारामती बातमी
आयर्नमॅन होण्यासाठी 3.8 k.m. पोहणे, 180 k. m. सायकलिंग आणि 42.2 k. m. धावणे हे आव्हान पूर्ण करावे लागते. त्याठिकाणी अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक वातावरण असतांनाही या खडतर परिस्थितीवर मात करीत अभिषेकने हे आव्हान 13 तास 33 मिनिटे 14 सेकंदात पूर्ण केले.
अभिषेक सतीश ननवरे