महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bapat Criticizes Sharad Pawar : शरद पवारांच्या बोलण्याला महत्व देण्याची गरज नाही; भाजप खासदार गिरीश बापट यांची पवारांवर टीका

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ( NCP leader Sharad Pawar ) यांच्या बोलण्याला जास्त महत्व देण्याची गरज नाही. पवारांच्या बोलण्यावर दिल्लीचे राजकारण चालत नाही अशी टिका भाजप खासदार गिरीश बापट ( BJP MP Girish Bapat ) यांनी केली आहे. ते आज पुणे महापालिकेतील विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पुण्यात आले होते.

Bapat Criticizes Sharad Pawar
खासदार गिरीश बापट यांची शरद पवारांवर टीका

By

Published : Jul 15, 2022, 8:13 PM IST

पुणे - शरद पवारांच्या बोलण्यावर दिल्लीचे राजकारण चालत नाही त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे जास्त महत्त्व द्यायची गरज नाही अशी टीका भाजपा खासदार गिरीश बापट ( MP Girish Bapat criticizes Sharad Pawar ) यांनी केली आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवनासमोर, ( Rashtrapati Bhavan ) संसदेवरसमोर कुठल्याही प्रकारचे आंदोलन निदर्शने करण्यासाठी बंदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्या निर्णयाविरोधात ही एकाधिकारशाही सुरू आहे. आम्ही विरोधकांचा आवाज उठवू असे, शरद पवार म्हणाले होते. परंतू, दिल्लीचे राजकारण ( Politics of Delhi ) शरद पवार यांच्या मनावर चालत नाही. शरद पवारांना एवढे महत्व देण्याची गरज नसल्याचे गिरीश बापट म्हणाले.

बापट यांची शरद पवारांवर टीका

हेही वाचा -Raj Thackeray : शिंदे-भाजप सरकारमध्ये अमित ठाकरेंना मंत्रीपद?; राज ठाकरे म्हणाले, 'त्या सर्व बातम्या...'

पुणे महानगरपालिकेच्या विविध प्रश्न संदर्भात त्याने आज महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी चर्चा केली मुसळधार पावसामुळे पुण्यात पडत असलेल्या रस्त्यावरील खड्ड्याचाही विचार झाला पाहिजे आणि त्याचीही केली पाहिजे आणि खड्डे न पडू द्यायची जबाबदारी घेतली पाहिजे. खड्डे नाही बुजवले तर, जास्त खड्डे पडतात. त्या संदर्भात माहिती घेऊन मी आदेश देतो असे, त्यांनी यावेळी माध्यमांना सांगितले. पुणे महानगरपालिकेमधील विविध प्रश्न तसेच डीआरडीओचा प्रश्न, घोरपडी रेल्वेयाडच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बापट आज महानगरपालिकेच्या आयुक्तात आले होते.

हेही वाचा -Devendra Fadnavis : मुख्यमंत्रीपद हिसकावल्यानंतर फडणवीसांवर केंद्राचा 'वॉच'; मर्जीतील अधिकाऱ्याकडे सोपवला कारभार

ABOUT THE AUTHOR

...view details