महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bandatatya Karadkar : बंडातात्या कराडकर यांची जीभ घसरली! महात्मा गांधींबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य - Bandatatya's controversial statement

बंडातात्या कराडकरांनी महात्मा गांधीच्या अंहिसावादी विचारांना लक्ष केले आहे. महात्मा गांधीजींचा अहिंसावाद आणि महात्मा गांधींचे हिंदूत्व हे दोन्ही पक्षपाती असल्याचे वादग्रस्त विधान जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केले आहे. पुण्याच्या राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरूंच्या स्मुर्तीस्थळावर कराडकर यांच्या प्रवचनच आयोजन करण्यात आले होते. त्यावळी ते बोलत होते.

किर्तनकार बंडातात्या कराडकर
किर्तनकार बंडातात्या कराडकर

By

Published : Mar 24, 2022, 12:10 PM IST

पुणे - नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असणाऱ्या बंडातात्या कराडकरांनी महात्मा गांधीच्या अंहिसावादी विचारांना लक्ष केले आहे. महात्मा गांधीजींचा अहिंसावाद आणि महात्मा गांधींचे हिंदूत्व हे दोन्ही पक्षपाती असल्याचे वादग्रस्त विधान जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केले आहे. पुण्याच्या राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरूंच्या स्मुर्तीस्थळावर कराडकर यांच्या प्रवचनच आयोजन करण्यात आले होते. त्यावळी ते बोलत होते.

किर्तनकार बंडातात्या कराडकर

पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार - महात्मा गांधीजींना म्हताऱ्याची उपमा देत त्यांच्या मार्गाने जाण्याचे कारण नाही. या म्हताऱ्याच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवायचा विचार केला, तर 1 हजार वर्ष लागतील असे वादग्रस्त वक्तव्य बंडातात्या कराडकरांनी केले आहे. बंडातात्या कराडकरांनी महात्मा गांधीच्या विचारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

साबरमती के संत तुन्हे कर दिया कमाल - देशाला (1947)ला स्वातंत्र्य मिळाले ते अंहिसेच्या मार्गाने मिळाले नाही तर (1942)क्रांतीकारक चळवळ उभी राहिली. त्या चळवळीचा बोध इंग्रजांनी घेतला. आणि त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. कुठेतरी सांगितले जाते की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी साबरमती के संत तुन्हे कर दिया कमाला मिली हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल असे म्हणणे म्हणजे झाशीच्या राणीसह 350 क्रांतीकारकांचा अपमान असल्याचे देखील यावेळी कराडकरांनी म्हटले आहे.

हेही वाचा -वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बंडातात्या कराडकरांचा माफीनामा... अटकेनंतर झाली सुटका

ABOUT THE AUTHOR

...view details