महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Annual Sugar Conference कोर्टाने आणि केंद्राने शेती संशोधनावर जी बंदी आहे ती उठवावी; शरद पवारांची प्रतिक्रिया - sharad pawar In Pune

Annual Sugar Conference शेत संशोधनावर बंदी नसावी त्यामुळे त्याचा परिणाम उद्योगावर होतो. साखर संशोधनावर काम झालं पाहिजे. परंतु कोर्टाने आणि त्यानंतर केंद्र सरकारनेही संशोधनावर बंदी घातली आहे, तर संशोधन कुठले व्हावे कुठले होऊ नये, हे ठरवलं पाहिजे. परंतु त्याच्यावर बंदी नसावी असा मताचा मी असल्याचे मत राष्ट्रवादीचे मुख्य अध्यक्ष शरद पवार NCP Chief President Sharad Pawar यांनी आज पुण्यात केला आहे.

Annual Sugar Conference
Annual Sugar Conference

By

Published : Sep 18, 2022, 6:05 PM IST

पुणेशेत संशोधनावर बंदी नसावी त्यामुळे त्याचा परिणाम उद्योगावर होतो. साखर संशोधनावर काम झालं पाहिजे. परंतु कोर्टाने आणि त्यानंतर केंद्र सरकारनेही संशोधनावर बंदी घातली आहे, तर संशोधन कुठले व्हावे कुठले होऊ नये, हे ठरवलं पाहिजे. परंतु त्याच्यावर बंदी नसावी असा मताचा मी असल्याचे मत राष्ट्रवादीचे मुख्य अध्यक्ष शरद पवार NCP Chief President Sharad Pawar यांनी आज पुण्यात केला आहे.

उसाचे क्षेत्र कमी केले पाहिजेडेक्कन शुगर इन्स्टिट्यूटच्या Deccan Sugar Institute साखर परिषदेला शरद पवार आज उद्घाटक म्हणून आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलेले आहे. त्याचबरोबर शेती क्षेत्रात काम करत असताना मध्यंतरी उसाचे क्षेत्र कमी करा. त्यामुळे भारतातले अन्नसुरक्षा कमी होईल, म्हणून आपण उसाचे क्षेत्र कमी केले पाहिजे, पण स्पर्धेमध्ये आपण ते करू शकलो नाही. नावे लागणे आपल्याला त्याचा स्वीकार ही करावा लागलेला आहे, असेही यावेळी शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवारांची प्रतिक्रिया

गुंतवणूक करण्याची मानसिकतायावेळी शरद पवार म्हणाले, साखर निर्यातीमध्ये भारत जगात अव्वल असला, तरी इथेनॉल निर्मितीवर अधिक भर द्यायला हवा. साखर धंद्यात अधिक संशोधन व्हावे आणि त्यासाठी मोठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. साखर उत्पादनातील संशोधनासाठी अर्थसंकल्पात तरतूद हवी. आतापर्यंत तशी तरतूद केलेली ऐकण्यात नाही. या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मानसिकता निर्णय घेणाऱ्यांमध्ये यावी, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ऊसाचे उत्पादन वाढविताना दुसरीकडे पर्यावरणातील बदल आणि त्याच्या समस्यांवर लक्ष केंद्रीय करायला हवे. कारण ते समजून घेणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांत आपण हवामानाचे बदल पाहत आहोत. एकीकडे साखर उत्पादन वाढविताना दुसरीकडे मातीची गुणवत्ता, जलसंवर्धन या गोष्टींवर लक्ष द्यायला हवे. असे शरद पवार म्हणाले आहेत.

इथेनॉलवर जास्त लक्ष ब्राझील हा देश साखर उत्पादनात अग्रेसर असला आहे. साखर उत्पादन हे त्यांचे उद्दिष्ट नसून, ते इथेनॉलवर जास्त लक्ष देतात. मी ब्राझिलच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. त्यांचे अधिक लक्ष हे साखरेपासून इथेनॉल अधिक कसे तयार करता येईल, यावर आहे. त्यासाठी ते काम करत आहेत. भारताने त्याबाबत विचार करावा, असे शरद पवार म्हणाले आहेत.

कापूस निर्यात करणारा जगातला दोन नंबरचा देश डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित या साखर परिषदेमध्ये राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कल्याण आप्पा आव्हाडे, तसेच साखर क्षेत्रात लग्न कार्य करणारे सर्व व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होते त्यांचा यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेला आहे. भारताने कापूस उत्पादनाची भरारी घेतली आहे, त्याचे कारण कापूस उत्पादनामध्ये झालेले संशोधन आहे. तसेच संशोधन या उसाच्या क्षेत्रामध्ये झालं पाहिजे, आणि त्यासाठीच काम केलं पाहिजे भारत आज कापूस निर्यात करणारा जगातला दोन नंबरचा देश आहे. त्याप्रमाणे जर आपण संशोधन केलं तर साखर उद्योग सुद्धा अडचणीत येणार नाही, असेही यावेळी शरद पवार म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details