पुणे - संपूर्ण जगासह देशात सध्या स्टार्टअपचा बोलबाला सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात स्टार्टअपच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. प्रत्येक स्टार्टअप कंपनी ही काहीतरी वेगळे प्रोडक्ट बनवून बाजारात आपल स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात असते. प्रत्येक क्षेत्रात स्टार्टअप कंपन्या आपली नवीन ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात असते. आपल्या कंपनीचं वेगळेपण निर्माण करण्यासाठी या स्टार्टअप कंपन्या आपल्या कंपनीला कल्पकतेची जोड देत असतात. पुण्यात देखील एक असेच स्टार्टअप आहे. जे आधुनिक युगात काहीतरी वेगळ करू पाहत आहे. बांबूंपासून बनवली जाणारी उत्पादनं थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याच्या हेतूनं या स्टार्टअपचे सर्वेसर्वा योगेश आणि अश्विनी शिंदे Shark Tank India या ( Bamboo India in Shark Tank India ) प्रसिद्ध कार्यक्रमात सहभागी झाले. त्यानिमित्तानं 'बांबू इंडिया'चा ( Start-up 'Bamboo India' ) प्रवास नेमका कसा होता? पाहा या स्पेशल रिपोर्टमधून.
पुण्यातील बांबू इंडिया ही कंपनी प्लास्टिकचा उपयोग होत असलेल्या ठिकाणी प्लास्टिक ऐवजी बांबूपासून वापरलेल्या वस्तू बनवत आहे. पुण्यातील बांबू इंडिया हे स्टार्टअप बांबूपासून अनेक गोष्टी बनवत आहे. टूथ ब्रश, पेन स्टँड, मोबाईल कवर, स्पीकर अश्या अनेक गोष्टी बनवत ही कंपनी प्लास्टिकला पर्याय शोधत आहे.
2016 मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने आता पर्यंत जवळपास 20 लाख किलो प्लास्टिक हे नष्ट केले आहे. प्लास्टिक ऐवजी बांबूच्या वस्तू बनवल्या आहेत. योगेश शिंदे आणि त्यांची पत्नी अश्विनी यांनी सुरु केलेले बांबू इंडिया हे स्टार्टअप, बांबूशी निगडित, इको-फ्रेंडली उत्पादने बनवते. तसेच प्लास्टिकच्या वस्तूंना बांबूने बदलण्याच त्यांचं उद्दिष्ट आहे.