पुणे- भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय पातळीवरील एकंदरीत काम हे लोकशाही धोक्यात आणणारे असल्याचे वक्तव्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. भाजप या देशात लोकशाही ठेवणार नसल्याची शंका येत आहे, असे ते म्हणाले. स्वर्गीय रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात थोरात यांनी उपस्थिती लावली.
'शरद पवारांची काळजी घेणे आपलं काम'; बाळासाहेब थोरातांची नाराजी
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावर थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. शरद पवार हे देश पातळीवरचे नेते असून त्यांची काळजी घेणे आपलं काम आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे हे चुकीचे पाऊल असल्याचे मत त्यांनी मांडले.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावर थोरात यांनी नाराजी व्यक्त केली. शरद पवार हे देश पातळीवरचे नेते असून त्यांची काळजी घेणे आपलं काम आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे हे चुकीचे पाऊल असल्याचे मत त्यांनी मांडले. नुकतेच मंत्र्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणावरून राज्यभरात वादविवादांना तोंड फुटले आहे. यावर बोलताना, केंद्र सरकारकडून व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यात येत असल्याचे ते म्हणाले. फोन टॅपिंग त्याचाच भाग आहे, असा आरोप थोरात यांनी केला.
मनसेच्या बदललेल्या भूमिकेवर बोलताना थोरात यांनी राज ठाकरेंकडून लोकशाही निगडीत कामाची अपेक्षा केली. राज ठाकरे यांनी लोकसभेच्या वेळी जी भूमिका घेतली होती, त्या भूमिकेशी कायम राहावे, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.