महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Balasaheb Sanap on Vijay Wadettiwar : ...तर विजय वडेट्टीवारांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन रस्त्यावर उतरावे - बाळासाहेब सानप - Vijay Wadettiwar about OBC reservation

पुण्यात ओबीसी व्हीजीएंटी (vjnt) जनमोर्चाची महत्वाची बैठक आज आहे. तर दुसरीकडे मुंबईत मंत्री विजय वडेट्टीवार हे देखील आज नवीन संघटनेची घोषणा करणार असल्याने ओबीसी समाजात फूट पडली आहे. मंत्री वडेट्टीवार यांच्या माध्यमातून आघाडी सरकार ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे, आम्ही हे सहन करणार नाही. ओबीसी व्हिजिएनटी संघटनेच्यावतीने कोल्हापूर ते मुंबई चैत्यभूमी रॅली काढण्यात येणार आहे. असे यावेळी ओबीसी व्हीजीएंटी जनमोर्चा संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी सांगितले आहे.

Balasaheb Sanap on Vijay Wadettiwar
बाळासाहेब सानप

By

Published : Feb 25, 2022, 2:01 PM IST

पुणे - पुण्यात ओबीसी व्हीजीएंटी (vjnt) जनमोर्चाची महत्वाची बैठक आज आहे. तर दुसरीकडे मुंबईत मंत्री विजय वडेट्टीवार हे देखील आज नवीन संघटणीची घोषणा करणार असल्याने ओबीसी समाजात फूट पडली असून मंत्री वडेट्टीवार यांच्या माध्यमातून आघाडी सरकार ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करत असून आम्ही हे सहन करणार नाही. ओबीसी व्हिजिएनटी संघटनेच्यावतीने कोल्हापूर ते मुंबई चैत्यभूमी रॅली काढण्यात येणार आहे. असे यावेळी ओबीसी व्हीजीएंटी जनमोर्चा संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी ( Balasaheb Sanap on Vijay Wadettiwar ) सांगितले आहे.

चौपाल

'तर त्यांनी राजीनामा देऊन रस्त्यावर उतरावे'

आघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नवीन नियोजित ओबीसी संघटनेशी vjnt जनमोर्चाचा कोणताही संबंध नाही. नव्या संघटनेवरून वडेट्टीवार यांच्यावर इतर ओबीसी नाराज असून ओबीसी vjnt जन मोर्चाच्या प्रत्येक मेळाव्याला वडेट्टीवार हे हजर असायचे. मंत्री असताना अश्या पद्धतीने नवीन संघटना काढणे कितपत योग्य आहे. जर मंत्री वडेट्टीवार यांना रस्त्यावर येऊनच काम करायचे आहे तर त्यांनी राजीनामा देऊन रस्त्यावर उतरावे. समाजाची दिशाभूल करू नये असे देखील यावेळी ओबीसी जनमोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. येणाऱ्या काळात ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी ओबीसी व्हीजीएंटी जनमोर्चा काम करणार असून वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू असे देखील यावेळी सानप यांनी सांगितले.

हेही वाचा -Who is Gangubai Kathiyawadi? : गंगूबाईचा "काठियावाड ते कामाठीपुरा" धक्कादायक जीवनप्रवास

ABOUT THE AUTHOR

...view details