पिंपरी-चिंचवड - ( पुणे) - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले वक्तव्य ( Bacchu Kadu over governor statement ) म्हणजे मूर्खपणा आहे. या शब्दांत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे. ते पिंपरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, ( Bacchu Kadu slammed governor Koshyari ) राज्यपाल हे खूप मोठे पद आहे. त्या पदाची गरिमा राखणे ( Status of governor ) गरजेचे आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या मताची नोंद होत ( controversy of Bhagatsingh Koshyari ) असते. भविष्यात ते पुस्तकरूपी वाचनात ही येतात. हे पाहता त्यांनी तुलनात्मक बोलणे गरजेचे असते. त्यामुळे हे वक्तव्य निंदनीय आहे. एवढा मूर्खपणा कोणीही केला नसता, तेवढा मूर्खपणा राज्यपालांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. राज्यपालांचे वाचन हे विचित्र पुस्तकाकडे गेले असेल. काही ठराविक वळणाकडे गेलेले दिसते. पण मी काय वाचले आणि मी काय बोलले पाहिजे, याचे भान राखायला हवे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा-Image of Mahavikas Aghadi : स्वच्छ प्रतिमेसाठी ठाकरे मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता
ईडी भाजपच्या कार्यालयाचा भाग
नवाब मलिकांनी राजीनामा देण्याचा विषयच येत नाही. कारण ईडी हा शासकीय विषय राहिलेला नाही. तो भाजपच्या कार्यालयातीलच एक भाग झाला आहे. त्यामुळे ईडीची कारवाई ही भाजपची कारवाई झालेली आहे.