महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला हजेरी - rss paraid

परिस्थितीनुसार संघाचे गणवेश आणि कार्यक्रमात काहीसा बदल झाला. मात्र, मनात काहीच बदल नाही, हा स्थायीभाव असून कधी ढळणार नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच संघ द्वेषवादी नसून प्रेम करणारा आहे. पुण्यातील पुरात संघ मदतीला धावून गेला असून अजून काम करणार असल्याचे बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

By

Published : Oct 8, 2019, 9:57 AM IST

Updated : Oct 8, 2019, 10:52 AM IST

पुणे- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला हजेरी लावली. पर्वती भागातील लक्ष्मीनगरच्या सह्याद्री मैदानावर ते उपस्थितीत होते. वय वर्षे 98 असतानाही संघाच्या गणवेशात पथसंचलनाला त्यांनी हजेरी लावली. खाकी फुल पँट, पांढरा शर्ट आणि संघाची टोपी यावेळी त्यांनी परिधान केली होती. यावेळी संघाच्या संपूर्ण कार्यक्रमात उभे राहून त्यांनी सहभाग घेतला.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला हजेरी

हेही वाचा - भारतीय वायुसेना दिवस : विशेष कार्यक्रमाला सुरुवात, थोड्याच वेळात होतील चित्तथरारक प्रात्यक्षिके...

संघ संचलनाला आल्यावर वय 98 नसून 28 वर्ष असल्याचे वाटते. मनातील उत्साह जागा होत असल्याचे बाबासाहेबांनी सांगितले. मी साधारण 1934 साली संघात आलो असून शेवटपर्यंत संघात काम करेन. सर्व देशबांधवांसाठी काही करायचे असून हा स्थायीभाव असल्याचे त्यांनी सांगितलं.

हेही वाचा - भारतीय हवाई दल दिन : तीनही दलाच्या प्रमुखांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली...

परिस्थितीनुसार संघाचे गणवेश आणि कार्यक्रमात काहीसा बदल झाला. मात्र, मनात काहीच बदल नाही, हा स्थायीभाव असून कधी ढळणार नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच संघ द्वेषवादी नसून प्रेम करणारा आहे. पुण्यातील पुरात संघ मदतीला धावून गेला असून अजून काम करणार असल्याचे बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले.

शस्त्रपूजन ही परंपरा आहे. आम्ही क्षत्रिय असून मातृभूमी संरक्षण आमचे काम आहे. तीनशे वर्षांपासून आम्ही घरी शस्त्रपूजन करतो. हेच काम करण्याचे व्रत असून संघाचा कोणत्याही संप्रदायाशी संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्याची सामाजिक परिस्थितीत संघाची विचारसरणी मार्गदर्शक आहे. मनातील राग गैसमज दूर व्हायची गरज आहे. द्वेष मत्सर न करता गैरसमज दूर व्हायची गरज बाबासाहेबांनी व्यक्त केली.

Last Updated : Oct 8, 2019, 10:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details