पुणे - आधीच्या सरकारने कोरेगाव भीमाचा केलेला तपास हा पूर्णतः चुकीचा आहे. स्वतःची चूक लपवण्यासाठी हा तपास एनआयएकडे दिला जातोय. हा तपास एनआयएकडून काढून घ्यावा, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ असा इशारा एल्गार परिषदेचे निमंत्रक माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी दिला आहे.
..त्यामुळेच कोरेगाव-भीमा प्रकरणात तपास एनआयएकडे देण्याचे षडयंत्र - बी.जी.कोळसे पाटील - एल्गार प्रकरण बद्दल बातमी
आधीच्या सरकारने कोरेगाव भीमाचा केलेला तपास पूर्णत: चुकीचा आहे. स्वत:ची चूक लपवण्यासाठी हा तपास एनआयएकडे दिला जातोय, असा आरोपी बी.जी.कोळसे पाटील यांनी केला, ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानाच्या वतीने पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कोळसे-पाटील बोलत होते. एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमाचा काहीही संबंध नाही. हे पोलिसांनी सुद्धा स्पष्ट केले आहे. एनआयएकडून हा तपास काढून घ्यावा, या मागणीसह कोरेगाव भीमा हल्ल्याचे खरे सुत्रधार मनोहर भिडे, मिलिंद एकबोटे यांना त्वरित अटक करण्यात यावी, या खटल्यात दोन वर्षांपासून अटकेत असलेले वकील, मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार आणि विचारवंत यांची बिनशर्त त्वरित सुटका करावी, 2 जानेवारी 2017च्या उस्फुर्त व 3 जानेवारी 2017 नियोजित महाराष्ट्र बंदमध्ये सामील झालेल्या कार्यकर्त्यांवरील सर्व केसेस बिनशर्त मागे घेण्यात याव्यात या मागण्या कोळसे-पाटील यांनी केल्या.